आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्वाने आत्मकेंद्री नसावे- संघ नेत्यांच्या नरेंद्र मोदींना कानपिचक्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस समारंभात नवी दिल्लीत गुरुवारी सायंकाळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी... - Divya Marathi
शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस समारंभात नवी दिल्लीत गुरुवारी सायंकाळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...
नागपूर- राजकारण, लोकसंग्रह, लोकसंपर्क आचरणशुद्धी हे नेतृत्वाचे गुण असल्याचे समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे. नेतृत्वाचे हे सार्वकालिक गुण आहेत. कोणत्याही नेतृत्वाने अपयशाची जबाबदारी स्वीकारून यशाचे श्रेय टीमला दिले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी गुरुवारी केले. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कानपिचक्या असल्याचा अर्थ यातून काढला जात आहे.

नागपुरातील मनोरमाबाई मुंडले व्याख्यानमालेत ते बोलत होते. 'नेतृत्व : काय, का कसे' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. 'नेतृत्व नेहमी पुढचा विचार करते. तत्कालिक लाभाचा विचार नेतृत्व कधीच करीत नाही. कोणतीही गोष्ट मॅनेज करणारे मॅनेजर होतात. ते बॉटम लाइनचा विचार करतात, तर नेतृत्व करणारे नेहमी टॉप लाइनचा विचार करतात. व्यवस्थापक काम योग्य रीतीने करील. पण नेतृत्व योग्य कामच करते. हा व्यवस्थापक आणि नेतृत्वातील फरक आहे,' असे सूचक व्यक्तव्य होसबळे यांनी केले.

नेत्याने यश आणि अपयशाला सारखेच स्वीकारले पाहिजे. अपयशाची जबाबदारी स्वत: स्वीकारून यशाचे श्रेय संघाला दिले पाहिजे. समन्वय आणि सुसंवादावर नेत्याचा भर असणे गरजेचे आहे. आपलेच म्हणणे इतरांना ऐकवण्यापेक्षा त्याने इतरांचेही ऐकले पाहिजे. लोक तुमचे म्हणणे आदर, आत्मीयता आणि प्रेमाने नाही तर तुम्ही 'कंट्रोलर' म्हणून ऐकतात. त्यामागे भीती असते, अशा सूचक वक्तव्यातून होसबळे यांनी मोदींना कानपिचक्या दिल्या. नेत्याने मनमिळाऊ असले पाहिजे. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहताना सर्वांना सोबत घेऊन चालले पाहिजे. नेतृत्व करणारा कितीही प्रामाणिक आणि देशभक्त असला तरी एकलकोंडा आणि आत्मकेंद्री असेल तर उपयोग नाही, असे होसबळे यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...