आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघ परिवाराचे चिनी वस्तूंवर बहिष्कार आंदोलन सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सीमेवर कुरापती करणाऱ्या चीनची आर्थिक कोंडी करण्याच्या उद्देशाने संघ परिवारातील स्वदेशी जागरण मंचाच्या स्वदेशी सुरक्षा अभियानाला विदर्भात सुरुवात झाली अाहे. मंचाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांना स्वदेशीचे महत्त्व पटवून देत आहेत.   
 
२० ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अभियानात विविध स्वयंसेवी संस्थांसह व्यावसायिकांच्या संघटनाही उतरल्या आहेत. या अभियानामध्ये घरोघरी जागृतीसह शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, बाजारपेठा, कार्यालयांमध्ये जाऊन चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे. चीनच्या आक्रमक भूमिकेमुळे देशासमोर निर्माण झालेले संकट, त्याचे धोके याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. नागपुरातील साडेतीन लाख घरांमध्ये मंचाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत. विदर्भातील प्रत्येकच जिल्ह्यात मंचाच्या कार्यकर्त्यांकडून सभा, संमेलने, मिरवणुका काढल्या जाणार आहेत. राखी पाैर्णिमेच्या निमित्ताने चिनी राख्यांवर बहिष्कार घालण्याच्या आवाहनामुळे बाजारपेठांमध्ये यंदा चिनी राख्या फारशा दिसत नाहीत.
बातम्या आणखी आहेत...