आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भारतमाता’ दुमदुमेल असे काम अाम्ही करू, सरकारी बाबूंमुळे वाढले घाेटाळे : चंद्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘भारतमाताकी जय ही घाेषणा जगात दुमदुमेल असे काम अाम्हाला करायचे अाहे’, असे अावाहन सरसंघचालक डाॅ. माेहन भागवत यांनी शुक्रवारी केले. सुयश चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित वनवासी कृषी ग्रामविकास कार्यकर्त्यांच्या त्रैवार्षिक संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. हेडगेवार स्मृती मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला झी माध्यम समूहाचे प्रमुख सुभाष चंद्रा यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
‘भारतमाता की जय’ सर्वांना म्हणायला शिकवले पाहिजे, या माेहन भागवत यांच्या वक्तव्याला एमअायएमचे नेते अाेवेसी यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर या मुद्द्यावरून देशभर वादंग माजले हाेते. शुक्रवारी या विषयावर बाेलताना भागवत म्हणाले, ‘अाम्ही भारतमातेसाठी काम करतो आणि हे चांगले काम आहे. एखादे चांगले काम होत असेल तर त्याचे सर्वत्र स्वागतच हाेत असते. चांगल्या कामात कोणताच वाईटपणा नसतो. काेणत्या धर्मातही कधीच वाईटपणा नसतो. कारण धर्मामुळे कधी कोणाचे वाईट होत नाही. धर्मामुळे कोणी दु:खी होत नाही. धर्म नेहमी सुखकारक आणि आनंददायी असतो. आम्ही धर्माचे काम करू तर देशाला पुढे नेण्यासाठी त्याचा उपयोगच होईल. जगात ‘भारतमाता की जय’ अशी घाेषणा दुमदुमेल असे काम अाम्हाला करायचे आहे. अाणि हे काम आम्हाला आमच्या कर्तृत्वावरच करायचे आहे. त्यासाठी आधी आम्हाला स्वत:च्या पायावर उभे राहावे लागेल आणि समाजालाही त्यासाठी तयार करावे लागेल’, असे भागवत म्हणाले.
‘देशातील वनवासी आदिवासी बांधव अतिशय निष्ठेने काम करतात. आपल्या देशाप्रति अशीच निष्ठा असायला हवी. देशाला पुढे घेऊन जायचे असेल तर ‘भारतमाता की जय’ म्हणणारा समाज तयार करावा लागेल’, असे मतही भागवत यांनी व्यक्त केले.
सुभाष चंद्रा यांनी नाेकरशाहीवर काेरडे अाेढले. ‘आजचे सरकार नोकरशाही चालवते. त्यामुळे संपूर्ण कारभार लालफीतशाहीत अडकला आहे. घोटाळे मोठ्या संख्येने होत आहे. ब्रिटिशांनी दिल्लीत बसून अापल्या देशावर राज्य केले. त्यामुळे त्यांना देशातील वस्तुस्थिती माहीत नसायची. नोकरशाहीलाही हीच सवय लागली आहे. मंत्रालयात बसून काम करणाऱ्या नोकरशाहीच्या प्रवृत्तीमुळे घोटाळे जास्त होत आहेत. सर्व नियोजन मंत्रालयात बसून होत असल्याने त्यात वास्तविकता कुठेच नसते. परिणामी घोटाळे भ्रष्टाचार वाढला. याचमुळे लोक नाराज होतात. ही व्यवस्था सुधारायची असेल तर वंचित घटकांचा सरकारमधील सहभाग वाढला पाहिजे. सामान्य माणसाच्या हातात शासनाची सूत्रे दिली तरच सरकारमध्ये सामान्यांचे प्रतिबिंब उमटेल,’ अशी अपेक्षाही त्यांनी बाेलून दाखवली.