आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या गणवेशात संघाचे अाज नागपुरात पहिले पथसंचलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव मंगळवारी (दि. ११) नागपुरातील रेशीमबाग येथे हाेणार अाहे. खाकी चड्डी जाऊन तपकिरी रंगाची फुलपँटचा गणवेशात केलेला समावेश व नव्या गणवेशात स्वयंसेवकांचे संचलन हे यंदाच्या साेहळ्याचे वैशिष्ट्य अाहे. तसेच सरसंघचालक डाॅ. माेहन भागवत यांच्याकडून यंदा मांडल्या जाणाऱ्या नव्या विषयांबाबतही उत्सुकता अाहे.
रेशीमबाग मैदानावर सकाळी ७.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय महसूल सेवेच्या १९७६ च्या तुकडीचे अधिकारी राहिलेले सत्यप्रकाश राय हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपची बडी नेतेमंडळीही सहभागी होणार आहे. अलीकडेच भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये धुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्समुळे देशांतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे. संघाने या कारवाईचे यापूर्वीच स्वागत केले असले तरी भविष्यातील दिशानिर्देश सरसंघचालक अापल्या भाषणातून स्पष्ट करतील, असा अंदाज अाहे. मराठा आरक्षणाबाबतही ते काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे. संघाच्या स्वदेशी जागरण मंचाने चिनी वस्तूंच्या बहिष्काराचे अभियान सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर संघातर्फे काही ठोस भूमिका मांडली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...