आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Think Tank Said Muslims Should Give Permission To Ram Mandir

राममंदिरासाठी मुस्लिमांनी सहमती द्यावी, संघ विचारवंत सिन्हा यांचे अावाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
नागपूर - ‘अयोध्येतील राम मंदिर, काशी व मथुरा ही तिन्ही मंदिरे हिंदूंची श्रद्धास्थाने आहेत. तत्कालीन मुस्लिम सम्राटांनी ही तीनही मंदिरे उद‌्ध्वस्त केली हाेती. तीनही मंदिरे महत्त्वाची असली तरी अयोध्येतील राम मंदिर अग्रक्रमावर आहे. मुस्लिम समाजबांधवांनी आनंदाने राम मंदिर निर्मितीसाठी सहमती द्यावी,’ असे आवाहन संघ विचारवंत राकेश सिन्हा यांनी रविवारी केले.

‘प्रत्येक दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान त्यांचा सहभाग पुरावे देऊनही स्पष्टपणे नाकारत होता; परंतु पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानची भाषा बदलली आहे. पाकिस्तान आता चौकशीला तयार आहे. त्यांनी भारताकडे आणखी पुराव्यांची मागणी केली आहे. पाकच्या भूमिकेत हा बदल घडवून आणण्यात भारताची मोलाची भूमिका आहे, असे सिन्हा यांनी स्पष्ट केले. जात आणि नवश्रीमंतांनी राजकारण नासवले अाहे. टाटा-बिर्ला आदी श्रीमंतांना केवळ धोरणात्मक लाभ हवे असायचे. पण आताच्या नवश्रीमंतांना सत्तेत वाटा हवा असतो. त्यांनी राजकारण भ्रष्ट केले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी ही अशीच पार्टी आहे, असे सिन्हा म्हणाले.

दहशतवादाशी लढा
पहिले लढाई पाकिस्तानशी होती आता दहशतवादाशी आहे. पाकिस्तानलाही दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. दहशतवादामुळे दोन्ही देशांचे नुकसानच होत आहे. त्यामुळे आपसांत लढण्यापेक्षा दहशतवादाला संपवणे महत्त्वाचे आहे, हे पाकला पटवून देण्यात भारताला यश येत आहे. परिणामी पाकिस्तान कारवाईला तयार झाला, याकडे सिन्हा यांनी लक्ष वेधले.

नासमज पाकची भीती
‘भारताने पाकिस्तानला लव्ह लेटर लिहिणे बंद केले पाहिजे. पाकिस्तानला जी भाषा समजते त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे’ असे वक्तव्य नरेंद्र माेदींनी निवडणुकीपूर्वी दिले हाेते. मात्र, अाता ते असे का करत नाहीत? असा प्रश्न विचारला जाताे. मोदीजी बोलले तसे करूही शकतात; पण पाकिस्तान केवळ शत्रू नाही, तो नासमज देश आहे, उद्या ते प्रत्युत्तरात मिसाइलही सोडू शकतात. शत्रूची नाही पण ना समज असलेल्यांची भीती वाटते ना, असे सिन्हा म्हणाले.