आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समान नागरी कायद्यासाठी 'संघ' मैदानात ! मुस्लिम राष्ट्रीय मंच करणार जनजागृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - समान नागरी कायद्यावर कायदा आयोगाचे मत मागवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा मुस्लिम संघटनांनी िवरोध दर्शवला असताना या कायद्याच्या आवश्यकतेबाबत मुस्लिम समाजात जागृतीसाठी संघ परिवारातील मुस्लिम राष्ट्रीय मंच ही संघटना मैदानात उतरणार आहे.
मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफजल यांनी याबाबत ‘दिव्य मराठी’शी बोलताना माहिती दिली. ‘येत्या काही महिन्यांत देशभरातील मुस्लिम धर्मगुरूंची बैठक घेऊन त्यांना या कायद्यासाठी प्रेरित करण्याचे आमचे प्रयत्न राहतील,’ असे स्पष्ट करताना सर्वांना समान वागणूक मिळावी यासाठी हा कायदा आवश्यक असल्याची भूमिका अफजल यांनी मांडली. मंचाची महिला शाखा त्यासाठी पूर्वीपासूनच प्रयत्न करीत आहे. गेल्यावर्षी अजमेर शरीफ येथे मंचातर्फे महिलांचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. त्यात या मुद्द्यावर चर्चाही झाली होती. मात्र, येत्या काही महिन्यात मंचाच्या वतीनेही जनजागृतीच्या दिशेने प्रयत्न होतील. लवकरच त्याची सविस्तर योजना तयार केली जाईल, असे अफजल यांनी या वेळी सांगितले.

इस्लामला धाेक्याची अाेरड
जगातील अनेक मुस्लिम देशांनी स्वत:चे कायदे तयार केले आहेत. मात्र, आमच्या देशातील तथाकथित सेक्युलर लोक त्यावर माेकळेपणाने चर्चाच होऊ देत नाहीत. त्यांचे मतपेढीचे राजकारण त्यामुळे अडचणीत येते, अशी टीकाही अफजल यांनी केली.

‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी जुळलेले लोक प्रामुख्याने समान नागरी कायद्याचा विरोध करीत असल्याचे दिसून येत अाहे. फौजदारी प्रकरणांमध्ये भारतीय कायदा लागू होणे त्यांना मान्य आहे. कारण इस्लामी कायद्यानुसार साध्या चोरीच्या गुन्ह्यासाठीही हात छाटण्याच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, त्यावर उलेमा मंडळी काहीच बोलत नाहीत. मात्र, आमच्या भगिनींच्या अधिकारांचा प्रश्न जेव्हा उपस्थित हाेताे तेव्हा मात्र इस्लामला धोका असल्याची ओरड अशा लाेकांकडून सुरू होते. या लाेकांची ही वागणूक म्हणजे केवळ दुटप्पीपणा आहे.

खरे सांगायचे तर समान नागरी कायद्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक अधिकारांना कुठेही बाधा पोहोचणार नाही. ही वस्तुस्थिती त्यांनाही मान्य असली तरी केवळ राजकीय स्वार्थासाठी, विरोधासाठी विरोध सुरू आहे’, असेही ते म्हणाले.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...