आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधारीच सुरू करणार मराठा आरक्षणावर चर्चा, विरोधक सरकारला कोंडीत पकडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निघणारे मोर्चे पाहून सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांना एक चांगली संधी मिळाली होती. परंतु याचा म्हणावा तसा फायदा विरोधक उचलू शकते नाहीत. मात्र आता याच मुद्यावर विरोधकांना नामोहरम करण्याची संधी सत्ताधारी घेणार असून मराठा आरक्षणाबाबतचा प्रस्ताव मंगळवारी भाजप विधानसभेत आणणार आहे. आशिष शेलार प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.

गेले काही महिने मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सुरुवातीला मराठा मोर्चाकडे कोणाचेच लक्ष नव्हते. परंतु हजारोंच्या संख्येने निघाणाऱ्या मूक मोर्चाकडे राजकीय पक्षांचे लक्ष गेले. हा मोर्चा सत्ताधारी भाजपच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. राजकीय नेत्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा समोर ठेवून मोर्चात मराठा म्हणून भाग घेतला. भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण होत असल्याचा भास निर्माण करण्यात आला. परंतु नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला याचे नुकसान न होता फायदाच झाला. मराठा तसेच मराठेतरांनीही भाजपाला भरघोस मते दिली. या मोर्चाचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला, परंतु त्यांनाच याचे सगळ्यात जास्त नुकसान झाल्याचे भाजपमधील सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

सूत्रांनी पुढे सांगितले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळाल्याने भाजप आनंदित असून मराठा आरक्षण आपणच मिळवून देऊ शकतो, हे मराठा समाजाच्या मनावर बिंबवण्यासाठी भाजपच मंगळवारी विधानसभेत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आणणार आहे. आशिष शेलार हा प्रस्ताव मांडणार आहेत. खरे तर आशिष शेलार यांना मंगळवारी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जायचे होते. मात्र, मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडायचा असल्याने त्यांनी आपले विमानाचे तिकीट रद्द केल्याचेही अधिकृत सूत्रांनी सांगितले.


काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची सोमवारी बैठक झाली. बैठकीत मराठा आणि धनगर आरक्षणासोबत नोटाबंदीवरून सरकारला कोंडीत पकडायचे आणि कामकाज होऊ द्यायचे नाही, असे ठरल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. सोमवारी नोटाबंदीवरून विरोधकांना चर्चेची मागणी केली होती, मात्र, सत्ताधाऱ्यांनी ती फेटाळली. विरोधकांनी चर्चा घ्याच, असा धोशा लावल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा नंतर करू पण तुम्ही हट्ट धराल तर भाजपच चर्चेचा प्रस्ताव मांडेल, असे म्हणताच विरोधक गप्प बसले होते.
बातम्या आणखी आहेत...