आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजलीसोबत सचिनने केली 4 वेळा जंगल सफारी, पहिल्‍यांदा पाहिला वाघ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपूर जिल्‍ह्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात रविवारी सचिन तेंडुलकर आणि त्‍याच्‍या कुटुंबाला अखेर वाघोबाने दर्शन दिले. ते 20 फेब्रुवारीला नागपूरवरून क-हांडला निघाले होते. वाघ पाहण्‍यासाठी दोन दिवसात त्‍यांनी चारवेळा जंगल सफारी केली. सचिनला दिसली 'चांदी' वाघीण....
- जंगल सफारीदरम्‍यान सचिन व त्‍याच्‍या कुटुंबाला प्रसिद्ध 'चांदी' वाघीण पिल्‍लांसोबत दिसली.
- काही मिनीटांच्‍या अंतराने ‘जय’ वाघाने त्‍यांना भेटीची हुलकावणी दिली.
- जंगलात पहिल्‍यांचा वाघ पाहण्‍याची संधी सचिनला क-हांडला मिळाली, अशी माहिती आहे.
सचिनसोबत कोण कोण होते....
सचिनसोबत पत्नी अंजली व मुलगा अर्जुनसह क्रिकेटर प्रशांत वैद्य, सुब्रतो बॅनर्जी, समीर दिघे आणि अतुल रानडे यांची यावेळी उपस्‍थिती होती. सचिन येथे आल्‍याची माहिती मिळताच त्‍याच्‍या चाहत्‍यांनी रिसॉर्टवर गर्दी केली होती. वन विभागाने त्‍यांना पेंच आणि बोर जंगलात सफारीसाठी आमंत्रण दिले होते. सचिन रविवारी सायंकाळी मुंबईला परतला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सचिन आणि कुटुंबाचे जंगल सफारीचे फोटो....