आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरात सायको किलरचा थरार, एकाच रात्रीत दोघांची दगडाने ठेचून हत्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपूरात बुधवारी मध्‍यरात्री दुहेरी हत्‍याकांड घडले. या प्रकरणातील आरोपीने दोघांची दगडाने ठेचून हत्‍या केल्‍याची माहिती समोर आली आहे. श्यामराव खाडे (वय 47) व ओम गिरी (वय 35) अशी मृतकांची नावे आहेत. तर, ज्ञानदेव राऊत असे 25 वर्षीय आरोपीचे नाव आहे.
- वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाडी खाडगाव रोडवर रात्री ही घटना घडली.
- सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर वाडी पोलीसांनी पंचनामा केला.
- तत्‍काळ कारवाई करून पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर राऊत याला अटक केली आहे.
- आरोपी हा मानसिक रोगी आहे. हत्‍या केली त्‍या मानसांशी त्‍याचा कोणताही संबंध नाही.
300 मीटर अंतरावर दोघांचे मृतदेह....
बुधवारी मध्‍यरात्री आरोपी ज्ञानदेव राऊत याने शामराव आणि ओम यांची दगडाने ठेचून हत्‍या केली. या दोघांचे मृतदेह एकमेकांपासून 300 मीटर अंतरावर आढळले. शामराव एका ट्रकवर ड्रायव्‍हर म्‍हणून काम करत होता. तो ट्रक पार्क करून झोपला असताना ही घटना घडली. तो गिट्टीखदान येथील येथील रहिवासी आहे. दुसरा मृतक ओम गिरी हा मुळचा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील रहिवासी असल्‍याचे सांगितले जात आहे. मनोरुग्‍ण आरोपीने या दोघांची नेमकी का हत्‍या केली हे स्‍पष्‍ट झाले नाही.