यवतमाळ- विदर्भातील यवतमाळ व वाशीम शहरांमध्येही आज सकल मराठा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन मुकमोर्चा काढला. यवतमाळच्या पोस्टल ग्राऊंडवरून मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाला सुरूवात झाली. हाती भगवे ध्वज घेऊन अबालवृद्ध अत्यंत शिस्त आणि शांततेत या मोर्चात सहभागी झाले होते. काळे कपडे परिधान करून विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन तरुणाई कोपर्डीच्या घटनेचा निषेध करत होती. एक मराठा लाख मराठा, असे लिहीलेल्या टोप्या घालून समाजबांधव मोठ्या संख्येन या मोर्चात सहभागी झाले. यवतमाळ व वाशीममध्ये पाऊस असूनही समाजबांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, वाशीम आणि यवतमाळ येथील मोर्चातील फोटो..