आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशीमबागेतून निघणार मराठा क्रांती मुकमोर्चा, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील मोर्चाकडे सर्वांच्या नजरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सकल मराठा क्रांती मोर्चा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यातून निघणार आहे. रेशीमबाग ते कस्तुरचंद पार्क असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. येथून काही मुली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देतील, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मोर्चा मंगळवारी सकाळी ११ वाजता रेशीमबागेतून निघणार आहे. येथे एक मोठा मंच उभारण्यात आला असून लोक येण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी १२ पर्यंत येथून मोर्चा निघेल अशी शक्यता आहे.

विदर्भात मराठा समाजाची संख्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मोर्चांसोबत याची तुलना होऊ शकणार नाही, असे विश्लेषकांचे मत आहे.
(संग्रहित फोटो)
बातम्या आणखी आहेत...