आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचाराच्या निषेधार्थ मराठा, बंजारांचा संताप; अमरावती, नाशिकमध्ये भव्य माेर्चाचे अायाेजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती, नाशिक - काेपर्डीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी ठाेठावण्यासह इतर मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी अमरावतीत विराट मूकमाेर्चा काढण्यात अाला. तर काही दिवसांपूर्वी चारवर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंजारा समाजाच्या वतीनेही नाशिकमध्ये भव्य अाक्राेश माेर्चा काढून नराधमावर कडक कारवाई करण्याची अाग्रही मागणी करण्यात अाली.

काेपर्डी प्रकरण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व अारक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी मूकमाेर्चे काढले जात अाहेत. गुरुवारी या अांदाेलनाला अमरावतीतही अपेक्षेप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे ८ ते ९ लाख अांदाेलक माेर्चात सहभागी झाल्याचा अंदाज संयाेजकांकडून वर्तवला जात अाहे, तर पाेलिसांच्या अंदाजानुसार ही संख्या अडीच ते तीन लाखांच्या घरात हाेती. अमरावतीत अाजवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विक्रमी सभा झाल्या. त्यालाही कमाल दीड लाखांपर्यंत श्राेत्यांची गर्दी हाेती. मात्र मराठा क्रांती मूकमाेर्चाने या गर्दीचाही उच्चांक माेडल्याची चर्चा शहरात हाेती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या माेर्चात महिला-युवतींची संख्या माेठ्या प्रमाणावर हाेती.

मंत्री रणजित पाटीलही सहभागी
नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधीही सहभागी झाले. चार युवतींनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना मागण्यांचे निवेदन सोपविले. या माेर्चामुळे सकाळी ९ पासून ते सायंकाळी ४ पर्यंत शहरातील सर्व व्यवहार बंद हाेते. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना, महापालिकेने मोर्चेकऱ्यांकरिता केलेली व्यवस्था आणि मोर्चाच्या आयोजकांनी केलेली शिस्तबद्ध आखणी यामुळे अतिशय शांततेत अांदाेलन पार पडले.
गुरुवारीअमरावती शहरात मराठा समाजाचा मोर्चा निघाला, नेहरू मैदान येथून मोर्चाला सुरूवात झाली, समाजबांधव इर्विन चौक मार्गे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. येथे पाहा, ड्रोन कॅमे-याने टीपलेले फोटो..
अमरावतीच्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद
राजापेठपासून राजकमल चौक, मालवीय चौक आणि चित्रा चौकपासून मालविय चौक, कोर्ट चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहनांना गांधी चौक, टांगापडाव चौक, चित्रा चौक, दिपक चौक, चौधरी चौक, विलास नगर चौकपासून बाबा कार्नर असा प्रवास करावा लागला. रेल्वे स्थानक चौकपासून राजकमल चौक, जयस्तंभ चौक, राजापेठपासून राजकमल चौक मार्गे मालवीय चौक, चित्रा चौक ते कोर्ट चौक आणि उड्डाणपुलाखाली वाहन पार्क करण्‍यास मनाई होती.

बडनेरा येथून गोपाळनगर टी-पॉईंटकडून येणाऱ्या जड व हलक्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली. बडनेरामार्गे बियाणी चौक, वेलकम पॉर्इंट, रहाटगाव रिगंरोड, कठोरा नाका, राजपुत ढाबा असा प्रवास या वाहनांना करावा लागला. वलगाव येथून काठोरा नाकामार्गेही वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे वेलकम टी-पॉर्इंट, बियाणी चौक, चपराशीपुरा मार्गे बसेसला प्रवास करावा लागला.
शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतली सुटी
आज शासकीय सुटी नाही. पण शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विभागप्रमुखांकडे अर्ज देऊन रितसर सुटी घेतली आहे. शिवाय इतर शहरांमधील मराठी बांधवही मोर्चात सहभागी होण्यासाठी शहरात दाखल झाले होते.
असे होते तालुक्याप्रमाणे पार्किंग स्थळ
नांदगाव खंडेश्वर- राजापेठ बसस्थानक, राजापेठ चौक. बडनेरा शहर - दसरा मैदान. भातकुली- धर्मदाय कॉटन फंड, वॉलकट कंपाऊंड. धामणगाव रेल्वे- आशीर्वाद मंगल कार्यालय, टोपेनगर. चांदूररेल्वे- आशीर्वाद मंगल कार्यालय, टोपेनगर.
पुढील स्लाईडवर बघा, अमरावतीतील मराठा मोर्चाचे फोटो.... अशी सुरु होती सकाळी तयारी.....
छायाचित्र- मनीष जगताप...
बातम्या आणखी आहेत...