आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूची अवैध वाहतूक; ट्रॅक्टर जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडकी - वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर राळेगाव तहसील प्रशासनाने कारवाई केली. ही कारवाई दहेगाव फाट्याजवळ केली. राळेगाव तालुक्यात सध्या वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. परिणामी, तालुक्यातील वडकी परिसरात नदी, नाल्यावरून वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या प्रकारामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. त्यात वडकी येथे वाळू माफियांनी दिवसरात्र रेती तस्करीचा गोरखधंदा सुरू केला आहे. तहसील प्रशासनाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर राळेगाव तालुक्यातील दहेगाव फाट्याजवळ सापळा रचण्यात आला. दरम्यान, वडकी येथील ट्रॅक्टर अवैद्य मार्गाने वाळू भरून नेत असताना पकडण्यात आले. चारही ट्रॅक्टर तहसीलदारांनी पकडून ते वडकी पोलिस ठाण्यात जमा केले. यामध्ये एमएच २९ के ३९७, एमएच २९ व्ही २०१५ असे ट्रॅक्टर असून, दोन ट्रॅक्टर विना क्रमांकाचे होते. १२८०० रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई तहसीलदार हेमंत गांगुर्डे, तलाठी बोभाटे, तलाठी तिरणकर यांनी केली 
बातम्या आणखी आहेत...