आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरोगामी महाराष्‍ट्रात अंत्‍यसंस्‍कारासाठी प्रेतासह पायपीट, मरणानंतर सरणापर्यंत 6 तास प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंगळे कुटुंबियांनी रस्‍त्यावर मृतदेह ठेवला. - Divya Marathi
इंगळे कुटुंबियांनी रस्‍त्यावर मृतदेह ठेवला.
बुलढाणा- वरवट बकालमध्‍ये एका समाजाला तब्‍बल 70 वर्षांपासून स्‍मशानभूमी नसल्‍याने गुरूवारी एका महिलेचे प्रेत रस्‍त्यावर ठेऊन लोकांनी निषेध व्‍यक्‍त केला. त्‍यानंतर गावक-यांनी संग्रामपूर तहसिल कार्यालयावर प्रेत घेऊन धडक दिली. पुरोगामी महाराष्‍ट्रात शरमेने खाली जावी अशी ही घटना घडली आहे, बुलढाणा जिल्‍ह्यातील संग्रामपूर तालुक्‍यात असलेल्‍या वरवट बकाल या गावात.
काय आहे प्रकरण..
- वरवट बकाल येथील एका समाजाला गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून हक्‍काची स्‍मशानभूमी नाही.
- गावातील राठोड या व्‍यक्‍तीच्‍या शेतात समाजाचे लोक अंतिम संस्‍कार करत होते.
- मात्र, राठोड यांनी याविरोधात कोर्टात धाव घेतली होती. निकाल त्‍यांच्‍या बाजूने लागला.
- त्‍यामुळे या समाजाला हक्‍काची स्‍मशानभूमीच नाही.
- काल गावातील लीलाबाई बळीराम इंगळे या वृद्ध महिलेचे निधन झाले.
- अंतिम संस्‍कारासाठी गेलेल्‍या लोकांना मनाई करण्‍यात आली.
- त्‍यानंतर इंगळे यांच्‍या नातेवाईकांनी वरवट बकाल-जळगाव रोडवर मृतदेह ठेऊन आंदोलन केले.
- तब्‍बल दोन तास वरवट बकाल-जळगाव रस्‍त्यावर वाहतूकीची कोंडी होती.
- त्‍यानंतर इंगळे कुटूंबियांनी मृतदेह घेऊन 5 किमी अंतरावर असलेले संग्रामपूर गाठले.
- मृतदेहासह नागरिकांनी तहसिल कार्यालयावर धडक दिली व निषेध व्‍यक्‍त केला.
6 तास मृतदेह घेऊन पायपीट..
इंगळे कुटुंबियांनी लीलाबाई यांचा मृतदेह घेऊन तब्‍बल सहा तास पायपीट केली, अंतिम संस्‍काराला जागा मिळावी यासाठी कुटुंबियांना रास्‍तारोको आंदोलन करावे लागले. अखेर या धक्‍कादायक बाबीची संग्रामपूरच्‍या तहसिलदारांनी दखल घेत, समाजासाठी वरवट बकाल शिवारातील जमिनीचा काही भाग स्‍मशानभूमीसाठी दिला.
सर्व छायाचित्र - शेख अनिस
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, बातमीशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...