आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात स्वच्छतेचा जागर, देशपांडे वाडीत स्वच्छता मोहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सुमारे सहा दशकांपूर्वी सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छतेचा मंत्र देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी शहरातील विविध भागात शेकडो नागरिकांनी स्वच्छता अभियानासाठी पुढाकार घेऊन महापुरुषाला भावपूर्ण नमन केले. स्वच्छतेअभावी निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाची वाट बघता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छतेचा जागर केल्याचे चित्र शहरात गांधी जयंतीनिमित्त िदसून आले. भल्या पहाटे उठून नागरिकांनी स्वत:च्या घरापुढीलच नव्हे तर बोळ, मोहल्ला, वार्ड मुख्य रस्त्याची स्वच्छता केली. ते बघून इतर नागरिकही त्यांच्यात सामील झाले. या स्वच्छतेमुळे डास, किटक रोग पसरवणाऱ्या माशांवर नियंत्रण िमळते. त्यामुळे सर्वप्रथम स्वच्छता ठेवणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे, अशी भावना स्वच्छतेसाठी हाती झाडू, टोपले घेऊन फिरणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली.
वसुधाताईदेशमुख कृषी महाविद्यालयाने बसवल्या कचरा कुंड्या : सौ.वसुधाताई देशमुख कृष्णी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री क्षेत्र तपोवनेश्वर संस्थान परिसर स्वच्छ राहावा म्हणून येथे कचरा कुंड्या बसवल्या. येथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची वाढती संख्या घनकचऱ्याची समस्या लक्षात घेत, विद्यार्थ्यांनी परिसरात कचरा कुंड्या बसवण्याचा निर्णय घेतला. या प्लॅस्टिकच्या कचरा कुंड्या हलक्या असल्यामुळे तसेच त्याला झाकण असल्यामुळे त्या उचलूनही नेता येतात तसेच यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरत नाही, या उद्देशाने नवीन प्रकारच्या कुंड्या कृषी महाविद्यालातील विद्यार्थी मुकेश तारापुरे, प्रसाद ठाकरे, अनुप चांदूरकर, विवेक कोकाटे, वैभव भालेराव, शुभम माळी, गंुजन कोहळे यांनी ठेवल्या आहेत.

स्वच्छतेसाठी सरसावली तरुणाई… :प्लॅस्टिकचे ग्लास, पाण्याच्या बाटल्या, कागदी प्लेट्स रस्त्यावर टाकू नये म्हणून घेणार काळजी, गांधी जयंतीचे औचित्य अन् नवरात्रोत्सव एकाच वेळी आल्यामुळे स्वच्छतेसाठी तरुणाई स्वयंस्फूर्तीने सरसावली. नवरात्रोत्सवामुळे श्री अंबादेवी मंदिर परिसरात लक्षावधी भाविक येत असतात. या परिसरात १० दिवस मोठी जत्रा असते. मात्र प्रशासनातर्फे म्हणावी तशी स्वच्छतेची सोय केली जात नाही. त्यामुळे रात्री सकाळी भाविकांची गर्दी ओसरल्यानंतर परिसर अस्वच्छ दिसतो, दुर्गंधी पसरते दरवर्षीचा हा प्रकार यंदा टाळण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेत लोकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासोबतच स्वत:ही १० दिवस प्रयत्न करून परिसर स्वच्छ राखण्यासाठी झटण्याचा निर्धार केला आहे.स्वत:सोबतच दुसऱ्यांनाही आनंद द्यायचा असेल तर स्वच्छता राखायलाच हवी, या उद्देशाने चुनाभट्टी, अमरावती येथील ३० ते ३५ तरुण रविंद्र पाचघरे गिरीश गंगावणे यांच्या नेतृत्त्वात स्वयंस्फूर्तीने स्वच्छतेसाठी पुढे आले आहेत.

नवरात्रोत्सवात दर्शन आटोपल्यावर भाविक फळे, केळी, उपवासाचे पदार्थ, मिठाईचा आस्वाद घेतात. पाणी पिऊन निघून जातात. असे करताना ज्या प्लेट्समध्ये ते खातात, प्लॅस्टिकचे ग्लास किंवा बाटल्यांमध्ये पाणी पितात त्या तशाच सोडून देतात. अनेकजन केळीची साल, उरलेली फळे, फुले तशीच सोडून देतात. त्यावरून चालताना अनेकांचे पाय खराब होतात, परिसरात अस्वच्छता पसरते, टाकलेले पदार्थ, प्लेट्स,
महात्मा गांधी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पहिल्या राज्यस्तरीय अमरावती अर्ध मॅरेथाॅन शर्यत ज्या मार्गावरून पुढे सरकली त्या मार्गावर पाण्याच्या बाटल्या, फळांच्या रसाचे पाऊच, केळींची साले इतर कचरा पडला होता. हा २१ कि.मी.चा मार्ग आयोजकांनी पूर्ण स्वच्छ करीत सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त रविनगर ते अंबादेवी मार्गावरील नागरिकांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यकर्त्यांसह हाती झाडू, टोपले, पोते घेऊन मुख्य रस्त्यावरील कचरा झाडून स्वच्छ केला. त्याचप्रमाणे वार्डातील नागरिकांनी त्यांच्या घरापुढे टाकलेला कचराही टोपले पोत्यात भरून तो परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेत ५० ते ६० सर्वच वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...