आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी ‘टीसीएस’शी सामंजस्य करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जागतिकीकरणाच्या युगात जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास शिक्षणावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रमिक परंपरागत शिक्षण पद्धती सोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमांचा लाभ घेता यावा तसेच केंद्र राज्य शासनाने स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया डिजिटल इंडिया यासारखे उद्योग सुरू करण्यासाठी साह्यभूत ठरणारे धोरण राबवण्यास सुरुवात केली. विद्यापीठाच्या माध्यमातून या उद्योगांना पूरक मनुष्यबळ मिळावे या उद्देशाने नुकताच विद्यापीठाने कॅम्पस टू काॅर्पाेरेट या अभ्यासक्रमाबाबत नुकताच टाटा कन्सल्टन्सीसोबत सामंजस्य करार करण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. 

पिकेल तिथेच खपेल या संकल्पनेला मूर्त रूप देण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. नांदगाव पेठ येथील पंचतारांकीत औद्यौगिक वसाहतीमध्ये भविष्यात येऊ घातलेल्या उद्योगांना तसेच राज्य देश पातळीवर लागणारे कुशल मनुष्यबळ विद्यापीठाच्या परिक्षेत्रातून उपलब्ध व्हावे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा प्रौढ निरंतर शिक्षण आणि विस्तार सेवा विभागामध्ये सामंजस्य करार करण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता प्रदान केली आहे. कॅम्पस टू काॅर्पोरेट ही संकल्पना घेऊन विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास साधून उद्योग जगताला लागणारी सक्षमता निर्माण व्हावी, या अनुषंगाने टीसीएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यंसाठी पूरक अभ्यासक्रम तयार केला. तसेच विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी संवाद कौशल्य, मुलाखतीची तयारी, या साठी अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांकडून तयारी करणार आहेत. यासाठी प्राध्यापकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असून ट्रेन ट्रेनर्स हा महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल. विद्यापीठाच्या परिक्षेत्रात सुरू झालेला हा अभ्यासक्रम हळूहळू संलग्नित महाविद्यालयांमध्ये देखील सुरू करण्यात येईल. रोजगारक्षम विद्यार्थी तयार होण्यासाठी ७० तासांचा अभ्यासक्रम निर्धारित केल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी संबोधित केले. या वेळी वित्त लेखाधिकारी डॉ. शशिकांत आस्वले, संचालक डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. गणेश मालटे, डॉ. विलास नांदुरकर, डॉ. चेतन राऊत, राजीव नरोन्हा, बाला नारायणजी, सरोज पांडा, मृदल चक्रवर्ती, मयन काक, एस. एन. राव उपस्थित होते. सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. देशमुख टीसीएससीच्या वतीने राजीव नरोन्हा यांनी सही केल्या. 
 
शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग 
विद्यापीठविद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांकरिता पाच दिवसांचा अल्पकालीन प्रशिक्षण वर्ग टीसीएसच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांच्या माध्यमातून आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्या जाईल. जास्तीतजास्त रोजगारक्षम विद्यार्थी रूपी मनुष्यबळ तयार होण्यास यामुळे मोठा हातभार लागणार आहे. 
 
कराराचे आहेत असे फायदे 
- विशेषत: कला, वाणिज्य, विज्ञान व्यवस्थापन या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. 
- ७० दिवसांच्या अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विनामूल्य पूर्ण करता येईल. 
- याशिवाय महाविद्यालयांना सुद्धा कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. 
- रोजगारक्षम विद्यार्थी तयार होण्यास हातभार लागणार. 
- विभागातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा होणार फायदा 
बातम्या आणखी आहेत...