आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्डन किड्समध्ये लाखोंचा घोटाळा; अापचा बाॅम्बगोळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- लेडी यशोदाबाई लेडीज क्लब द्वारे संचालित गोल्डन किड्स इंग्रजी प्राथमिक, गोल्डन किड्स मराठी प्राथमिक, गोल्डन किड्स मराठी माध्यमिक, गोल्डन किड्स इंग्रजी माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, या घोटाळ्याला वाचा फोडण्यासाठी येत्या आॅगस्ट पासून गोल्डन किड्स शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेपुढे बेमुदत उपोषणाला बसणार असून या आंदोलनाला आपचा जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

संस्थेच्या सचिव हर्षदा पांडे यांनी संपूर्ण संस्थेवर ताबा िमळवून संपत्ती वाढवणे सुरू केले आहे. नियमांची पायमल्ली करून संपत्ती जमवण्याचे काम सुरू आहे. त्याची संस्था धर्मदाय आयुक्तांकडे कोणतीही नोंद नाही. जेणेकरून भविष्यात संपत्तीवर ताबा िमळवता यावा. तसेच त्यांचे पुत्र पराग पांडे हे पालकांकडून अवाजवी शुल्क वसूल करत असतात. त्या तुलनेत शिक्षकांना मात्र फारच कमी मानधन िदले जाते, असा ठपकाही आपद्वारे ठेवण्यात आला आहे.

अनेक खासगी शिक्षण संस्था दर्जेदार शिक्षण देण्याच्या नावावर पालकांचे आर्थिक शोषण करीत असून, ही संस्थाही त्याचाच एक भाग आहे. पालकांकडून अमाप शिक्षण शुल्क वसूल करणाऱ्या या संस्थेच्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा आरोप गोल्डन िकड्स शाळेतील शिक्षक आपचे कार्यकर्ते िकरण गुडधे यांनी केला आहे.

हर्षदा पांडे या संस्थेच्या सचिव असल्या तरी सर्व काम त्यांचे पूत्र पराग पांडे हेच बघतात. त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. संस्थेच्या विविध माध्यमांच्या शाळांमधील शालेय शुल्कात बरीच तफावत आहे. २००८ ते २०१५ मधील आॅडिट रिपोर्टनुसार ४१ लक्ष रुपयांचा हिशेबच नाही. त्यामुळे आठ महिन्यांआधीच आपने धर्मदाय सहआयुक्तांना लेडी यशोदाबाई जोशी लेडीज क्लब (एफ-१०२) या शैक्षणिक संस्थेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार िदली होती. त्या अनुषंगाने माहितीच्या अधिकाराद्वारे अनेक कागदपत्रे मागितली. त्याद्वारे सत्य बाहेर आले. मुख्यमंत्र्यांपासून ते शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत बरेचदा लेखी तक्रारी देण्यात आल्या. परंतु, प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे संस्था बिनबोभाटपणे गैरव्यवहार करीत आहे. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाची संस्थेशी साठगाठ असल्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत, अशी माहिती किरण गुडधे, लेफ्ट. कमांडर अलीम पटेल, संजय पांडव, राहुल चव्हाण, रंजना मामर्डे, प्रमोद कुचे, प्रवीण काकड, अॅड. नितीन उजगावकर यांनी िदली.

पत्रकार परिषदेला रितेश ितवारी, श्याम फुले, सुरेश साहू, मुजीब खान, किशोर इंदाणी, मुबीन खान, सोहेल खान, सुरेंद्र उमाळे, अशोक वानखडे, फिरोज खान, गुलशन मकडेजा, कावनपुरे, रवींद्र कावरे, मजीद खान, राजाभाऊ निर्मळ, रामेश्वर स्वर्गे, गोपाल रिठे, रुपेश गावंडे, समीर खान, शंतनू जगताप हे आप कार्यकर्ते उपस्थित होते.

भ्रष्टाचारांचा वाचला पाढा
सर्वकर्मचाऱ्यांचे वेतन शासकीय नियमानुसार नियमितपणे व्यवस्थापन करीत नाही, बिंदू नियमावलीनुसार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही, कर्मचारी सेवा ज्येष्ठता यादी नाही, कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले नाही, शाळेत अनेक कर्मचाऱ्यांचे अप्रुव्हल काढण्यात आले नाही, कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तके प्रदान करण्यात आली नाही, आरटीई कायदा २००९ नुसार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेचा अभाव, निविदा काढता शाळेची कामे केली जातात, शालेय शुल्क निश्चितीचे ठराव पालक-शिक्षक संघाच्या अामसभेत मंजूर करता प्रस्तावित शुल्क निश्चित केले जाते, संस्था पदाधिकारी ठराव घेता बँकेचे व्यवहार, आर्थिक व्यवहार करतात, सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयाच्या परिशिष्ठ एक मध्ये २०१२ ते २०१७ च्या कार्यकारिणीची नोंदच नाही, काही शिक्षकांना महागाई भत्ताही दिला जात नाही, अशाप्रकारे संस्थेच्या भ्रष्टाचाराचा पाढाच आपतर्फे वाचण्यात आला.

३० लाखांचा भ्रष्टाचार
संस्थेत वर्षाला सुमारे ३० लाखांचा भ्रष्टाचार होत असून,संस्था विविध मार्गाने पालक शिक्षकांची पिळवणूक करत आहे. नुकताच संस्थेविरुद्ध उत्पन्न जास्त तर खर्च कमी असा अहवाल शिक्षण विभागाने दिला आहे. धर्मदाय आयुक्तांनी ४१/डी अंतर्गत सू मोटो दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी शिक्षण विभागाला वारंवार निवेदन देऊन काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.

संस्थेचे आपसातील वाद, शिक्षकांना नियमित मानधन देतो
लेडी यशोदाबाई लेडीज क्लब या संस्थेच्या आपसातील वादाबाबत धर्मदाय आयुक्तांकडे सुनावणी सुरू आहे. माजी अध्यक्षा कुळकर्णी यांनी पदाचा गैरवापर करताना संस्थेला अनुदान नको असे स्टँप पेपरवर लिहून दिल्यामुळे त्यांना पदावरून काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केली. संस्थेत कोणताही भ्रष्टाचार नाही. २०१२ मध्ये आमची चौकशी झाली तसेच हायकोर्टातही आम्ही जिंकलो आहे. कायम विनाअनुदानीत शाळा असल्यामुळे आम्ही पालकांकडून शिक्षण शुल्क घेतो. त्याआधारे शिक्षकांना अगदी नियमितपणे मानधनही देत असतो. परागपांडे, कार्यालयीन सचिव, गोल्डन किड्स स्कूल.
बातम्या आणखी आहेत...