आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्कूल ऑटोरिक्षाच्या नवीन डिझाइनला त्वरित मंजुरी द्या'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सध्याच्या ऑटोरिक्षा धोकादायक असून अधिक सुरक्षित ऑटोरिक्षा निर्मिती करण्यासाठी तीन कंपन्यांनी नवीन डिझाइन तयार केले आहे. हे डिझाइन पुणे येथील ऑटोमोटिव्ह कौन्सिल ऑफ इंडियाकडे मंजुरीसाठी पाठवले असून, कौन्सिलने एका आठवड्यात त्यावर निर्णय घ्यावा, असे निर्देश नागपूर खंडपीठाने बुधवारी दिले.

या विषयीच्या याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारने माहिती दिली की, विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी कंपन्यांना नवीन आणि सुरक्षित डिझाइनच्या ऑटोरिक्षा तयार करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार तीन कंपन्यांनी डिझाइन तयार केले असून ते मंजुरीसाठी ऑटोमोटिव्ह कौन्सिल ऑफ इंडियाला पाठविण्यात आले आहे. कौन्सिलची मंजुरी मिळताच नवीन डिझाइनच्या ऑटो तयार करण्यात येतील. राज्य सरकारची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने, ‘कौन्सिलने नवीन डिझाइनला आठ दिवसांत मंजुरी द्यावी, केंद्र सरकारने तीन आठवड्यात नवीन ऑटो निर्मितीचा निर्णय घ्यावा’, असे निर्देश दिले.