आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Nutritional Support All Time Available In Drought Villages

दुष्काळी गावांमध्ये मिळणार सुटीतही शालेय पोषण आहार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दुष्काळग्रस्त गावांत सुटीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण दिल्या जाणार आहे. पैसेवारी ५० पैशांच्या आत असलेल्या १९६७ गावांतील विद्यार्थ्यांना हा शालेय पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे. शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझडे यांनी याबाबत एप्रिलला शिक्षण विभागाला निर्देश दिले आहे.
जिल्ह्यात २०१५-१६ या खरीप हंगामात निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली नाही. अनियमित पावसामुळे अनेक गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे उत्पादन नाही, पिण्यास पाणी नाही अशा स्थितीत विद्यार्थ्यांची ससेहोलपट होऊ नये म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांकडून हा निर्णय घेण्यात आला. खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० च्या आत आलेली आहे, ती गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दुष्काळग्रस्त भागात उन्हाळी सुटीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणे बंधनकारक आहे. ज्या शाळेत तांदूळ धान्य उपलब्ध नसेल तर नजीकच्या शाळेतून उपलब्ध करून घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. उपलब्ध झालेल्या साठ्याबाबत लेखी स्वरूपात पोच देण्यात यावी, तद्नंतर त्या शाळेला परत करण्याबाबतदेखील सूचित करण्यात आली आहे. अथवा पर्यायी व्यवस्था करून एकही विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतदेखील सूचित करण्यात आले आहे. शिक्षण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या या शालेय पोषण आहारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, यात शंका नाही.

पैसेवारीच्या आतील गावांना लाभ
गावांतील विद्यार्थ्यांना मिळेल लाभ
जिल्ह्यातील पैसेवारीची स्थिती
तालुका गावे ५० आज ५० जास्त टक्के
अमरावती१४४ १४३ निरंक ३७
भातकुली १३७ १३७ निरंक ४३
नांदगाव खं. १६१ १६१ निरंक ४४
चांदूर रे. ९३ ९० निरंक ४३
धामणगाव ११२ ११२ निरंक ४२
तिवसा ९५ ९५ निरंक ३९
मोर्शी १५६ १५६ निरंक ४५
वरुड १४० १४० निरंक ४५
अचलपूर १८४ १८४ निरंक ४४
चांदूरबाजार १७० १७० निरंक ४५
दर्यापूर १५० १५० निरंक ४४
अंजनगाव १२७ १२७ निरंक ४२
धारणी १५३ १५२ निरंक ४२
चिखलदरा १६३ १५० निरंक ४४
एकूण१९८५ १९६७ निरंक ४३