आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र: उपराजधानीत गुन्‍ह्याचे सत्र थांबेना, शाळकरी मुलाचे अपहरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपुरमध्‍ये दिवसेंदिवस वाढणारी गुन्‍हेगारी थांबायचे नाव घेत नाही. शहरातील मनीषनगरमध्ये एका 14 वर्षीय शाळकरी मुलाचे गुरुवारी दुपारी अज्ञान आरोपींनी कारमधून अपहरण केले आहे. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली. चैतन्य आष्टनकर असे अपहरण झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.
चैतन्‍य आहे आठवीचा विद्यार्थी...
- चैतन्य सुभाष आष्‍टनकर हा इयत्‍ता आठवीचा विद्यार्थी आहे.
- मिळालेल्‍या माहितीनुसार, तो चैतन्‍य मॉन्टफोर्ट स्कूलमध्ये शिकत आहे.
- चैतन्यचे वडील सुभाष आष्‍टनकर आणि आई दोघेही शिक्षक आहेत.
- चैतन्‍य दररोज मित्रांसोबत स्‍कुल बसने शाळेत जात असे.
असे झाले अपहरण...
- चैतन्य आणि त्याचा शेजारचा मित्र दोघेही स्‍कुल बसमधून उतरून घराच्या दिशेने निघाले.
- काही अंतरावर पोहोचताच मारुती व्हॅनमधून आलेल्या काहींनी चैतन्यला उचलून आत ओढले.
- नंतर कार वेगात निघून गेली. काही कळायच्‍या आत ही घटना घडली.
- घटनेची माहिती मित्राने चैतन्यची बहिण गायत्रीला हिला दिली.
- वडील सुभाष आष्टनकर यांनी सोनेगाव पोलिसात तक्रार केली.
- पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविल्‍याची सुत्रांची माहिती आहे.
- चैतन्‍यचे अपहरण का केले याचे कारण अजूनही उघड झाले नाही.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अपहरणकर्त्‍याचे स्‍केच...
रायगड - उरणमध्‍ये बस, सिलेंडर ट्रक यांच्‍यात अपघात