आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या स्कूटरने घेतला अचानक पेट, परतवाड्यातील फातेमा शाळेजवळची घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- अमरावती मार्गावरील विदर्भ मिल चौक ते फातीमा शाळेच्या दरम्यान शनिवारी (दि. २२) सकाळी साडे दहाच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या स्कूटरने अचानक पेट घेतल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ब्राह्मणसभा कॉलनी येथील निवासी प्रमोद इंगोले हे आपल्या स्कूटरने (एमएच २७/ एम ९२०३) जात असताना फातिमा शाळा परिसरात अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याची बाब लक्षात येताच इंगोले यांनी गाडी तेथेच सोडून सुरक्षित स्थळ गाठले. सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही. या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
बातम्या आणखी आहेत...