आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 हजार 860 जागांसाठी निघाली पहिली सोडत, आरटीईअंतर्गत आले होते 5030 ऑनलाइन अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वंचित घटकातील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के आरक्षणातून प्रवेश मिळावा म्हणून पहिली सोडत मंगळवारी(७ मार्च) काढण्यात आली. भातकुली पंचायत समिती सभागृहात सकाळी ११ वाजता काढण्यात आलेल्या सोडतीत ५०३० ऑनलाइन अर्ज विचारात घेण्यात आले. 
 
बालकांचा मोफत सक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत जिल्ह्यातील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वंचित घटकासाठी आरक्षित २५ टक्के जागेवरील प्रवेश दिले जाणार आहे. वंचित घटकातील पालकांकडून ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आल्यानंतर घरापासून कमीत कमी अंतरावरील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याचे कायद्यात नमूद करण्यात आले आहे. राज्यात या कायद्यावर २०१४ पासून अंमल करण्यास सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात खाजगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये २१४ शाळांचा समावेश आहे. 

या शाळांमध्ये एकूण पटसंख्येच्या आधारावर २५ टक्के जागा वंचित घटकातील मुला-मुलांसाठी आरक्षण ठेवल्या जातात. या अंतर्गत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क तसेच अन्य खर्च शासनाकडून अदा केल्या जाते. एक ही मूल दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहू नये हा त्यामागील उद्देश आहे. सोडत काढण्यात आल्यानंतर ऑनलाइन अर्ज केलेल्या पालकांच्या मोबाइल प्रवेशाबाबत संदेश पाठविण्यात आला आहे. शिवाय कोणत्या शाळेत प्रवेश घेण्यास जावयाचे आहे, याची माहिती देखील संकेतस्थळावर पालकांना पाहता येणार आहे. 
 
असे अर्ज, अशा जागा 
नामांकितइंग्रजी शाळा - २१४
वर्गएकसाठी जागा - २५३०
नर्सरीसाठी आरक्षित जागा - ३३०
एकूणप्राप्त ऑनलाइन अर्ज - ५०३०
बातम्या आणखी आहेत...