आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा, शहरात लवकरच साकारणार दुसरे जिल्हा क्रीडा संकुल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - क्रीडानगरी अशी ख्याती असलेल्या अंबानगरीत लवकरच दुसरे जिल्हा क्रीडा संकुल साकारणार असून यादिशेने प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोरील २८ हजार चौरस फुट जागेवर या संकुलाची नि‍र्माण होणार आहे.
विशेष बाब अशी की, ज्या सुविधा सध्या अस्तित्वात असलेल्या विभागीय क्रीडा संकुलात नाहीत त्याचे या नव्या जिल्हा क्रीडा संकुलात नि‍र्माण होणार आहे. अमरावतीत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू घडत असतात. परंतु, त्यांना नि‍यमित सराव करण्यासाठी कोणतेही केंद्र शहरात उपलब्ध नसल्यामुळे पैसे खर्च करून मुंबई, पुणे, दि‍ल्ली, हैदराबाद, लुधियाना या ठिकाणी जावे लागते. नेमकी हीच बाब हेरून नव्या जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचा सुविधा खेळाडूंना मिळतील, असे प्रयत्न केला जाणार आहे. नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे शहराचे आमदार डाॅ. सुनील देशमुख यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात पत्र दि‍ले. तसा तर या संकुलाबाबत प्रस्ताव जिल्हा क्रीडा समितीतर्फे आधीच राज्याच्या क्रीडा मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. आता वाट आहे ती केवळ शासनाकडून मंजुरी मि‍ळण्याची.

शासनाकडून मंजुरी मि‍ळाल्यानंतर कोटी रु. खर्चून नागपूर, नाशिक लातूरच्या धरतीवर जिल्हा क्रीडा संकुल उभारले जाईल. यासाठी अमरावती येथील क्रीडा प्रेमींसह विविध संघटनांचा जोरदार पाठिंबा असून ज्या सुविधा विभागीय क्रीडा संकुलात निर्माण होऊ शकल्या नाहीत, त्या नव्या जिल्हा क्रीडा संकुलात असाव्यात अशी सर्व क्रीडा प्रेमींची इच्छा आहे.

येत्या काही दि‍वसांत पुण्यात राज्य क्रीडा परिषदेची बैठक होणार असून तेथेही या संकुलाचा प्रस्ताव राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्यापुढे मांडला जाणार आहे. ते राज्य क्रीडा परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीत सकारात्मक पद्धतीने प्रस्ताव मांडून मंजुर करून घेण्याकडे आमचा कल असेल, असे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सांगितले.

गत काही वर्षांपासून अमरावती येथे असलेले जिल्हा क्रीडा स्टेडियम हे केवळ नावालाच असून येथे शासकीय समारंभांशिवाय अन्य कोणत्याही क्रीडा स्पर्धा होत नाही. राज्य शालेय क्रीडा स्पर्धेशिवाय अन्य कोणतेही मोठे आयोजन येथे शक्य नाही. अगदी अॅथलेिटक्स स्पर्धाही आयोजित करायच्या म्हटले की, उत्तम सोयी नाहीत. ट्रॅक नाही. त्यामुळेच शहरात दर्जेदार क्रीडा संकुल असावे अशी मागणी जोर धरत होती. ती बघता स्थानिक नेते, जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासह विविध क्रीडा संघटना, संघटक आणि क्रीडाप्रेमीही शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडा संकुल िमळावे यासाठी सामूिहक प्रयत्न करीत आहेत.
याआंतरराष्ट्रीय खेळांच्या सुविधा : अमरावतीधनुर्धरांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र येथे अजूनही अत्याधुनिक आर्चरी रेंज िनर्माण झाले नाही. त्यामुळे नव्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्चरी रेंज उभारले जाणार आहे. सायकलपटूसाठी सुद्धा येथे व्हेलोड्रोम, ज्युदो हाॅल आणि विविध खेळांच्या सुविधा येथे राहणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी मि‍ळवून दि‍ली जागा
अमरावतीविद्यापीठापुढील जागा ही प्रबोधिनीसाठी शासनाकडून िमळाली होती. परंतु, प्रबोधिनीला शासनाने अनुदान देणे बंद केल्याने ही जागा तशीच पडून होती. या जागेचा चांगला उपयोग व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ही २८ हजार चौरस फूट जागा जिल्हा क्रीडा संकुलासाठी एक महिनापूर्वीच उपलब्ध करून िदली आहे. तहसीलदार बगळे यांचे सहकार्य लाभल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणाले.

खेळाडू निर्माण करण्याची संधी
-नव्याजिल्हाक्रीडा संकुलामुळे जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आपल्याकडे अनेक होतकरू खेळाडू असले तरी महागाईमुळे अंगी प्रतिभा असूनही अनेक खेळाडंूना मध्येच खेळ सोडावा लागतो. यापुढे मात्र असे घडणार नाही. गणेशजाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी
बातम्या आणखी आहेत...