आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौर ऊर्जेद्वारे उजळणार नेहरू जिल्हा स्टेडियम, रात्री सराव करणाऱ्या खेळाडूंना होणार फायदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावतीयेथील पं. जवाहरलाल नेहरू िजल्हा स्टेडियम हे येत्या दोन िदवसांत सौर ऊर्जेद्वारे उजळणार अाहे. आजवर स्टेडियमच्या बाहेरच लाइट्स होते. मात्र, आता स्टेडियमच्या आता सुमारे ८० सौर दिवे सभोवताल बसवण्यात आल्यामुळे रात्री सराव करण्यास इच्छुक खेळाडू, पायी फिरण्यासाठी येणारे नागरिक यांच्यासाठी सोय होणार अाहे. यासोबतच बरेचदा स्टेडियममध्ये असामाजिक तत्त्वांचा वावर असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आल्यामुळे तातडीने ही व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या कारवायांना आळा बसेल, हाच यामागील उद्देश आहे.

विभागीय स्टेडियम परिसरात एकूण १८० सौर िदवे बसवले जाणार असून, िजल्हा स्टेडियमच्या आत त्यांपैकी ८० बसवण्यात आले आहेत. काही प्रबोधिनी, धनुर्विद्या रेंज, बास्केटबाॅल स्टेडियमवरही बसवले जातील. त्यामुळे विजेची बचत होऊन नेहमी अंधारात असलेले स्टेडियम उजळेल. याचा लाभ रात्री नंतर फिरायला येणारे मध्यमवयीन ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. तसेच खेळाडूंनाही बिनधास्तपणे उशिरा रात्रीपर्यंत सराव करता येईल.

४०लाख खर्चून केली सोय :
राज्यशासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत ४० लाख रुपये खर्चून ही सोय करण्यात आली आहे. संपूर्ण विभागीय स्टेडियम परिसरात १८० सौर िदवे बसवले जाणार असल्यामुळे रात्रीच्या अंधारातही विजेसाठी एकही रुपया खर्च करता िजल्हा स्टेडियम उजळणार आहे. ३५ लाख रुपये सौर िदव्यांवर आणि लाख रुपये सौर बंबासाठी खर्च करण्यात आले आहे. हे बंब प्रबोधिनीत बसवण्यात आले आहेत.
सुमारे ४० लाख रुपये खर्चून पहिल्या टप्प्यात ८० सौर िदवे बसवण्यात आले आहेत.
सुविधाजनक