आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात वर्षांच्या मूकबधिर चिमुकलीशी वर्ग शिक्षकानेच केले अश्लील चाळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील एका मूकबधिर विद्यालयात शिकणाऱ्या अवघ्या सात वर्षांच्या विद्यार्थिनी सोबत वर्गशिक्षकानेच शाळेत अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना गुरूवारी (दि. १५) घडली. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच खोलापुरी गेट पोलिसांनी शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या त्या नराधम शिक्षकाला अटक केली. दरम्यान, या नराधमाला घेऊन पोलिस शुक्रवारी (दि. १६) न्यायालयात पोहचले असता मनसेच्या संतप्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्याला थापडांचा ‘प्रसाद’ दिला. मात्र, तगडा पोलिस बंदोबस्त असल्यामुळे नराधमाचा बचाव झाला. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दीपक भाऊरावजी उघडे (४४, रा. पोटे टाऊनशिप, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. दीपक उघडे हा शहरातीलच एका मूकबधिर विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, त्याच शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या एका मूकबधिर चिमुकली सोबत त्याने शाळेतच अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरूवारी (दि. १५) गणेश विसर्जन असल्यामुळे शाळेत केवळ दोनच िवद्यार्थी आले होते. त्यामध्ये ही पीडित चिमुकली अन्य एका मुलाचा समावेश होता. शाळेत एकूण चार शिक्षक असून,त्यापैकी दोन महिला दोन पुरूष शिक्षक आहेत. दोन पुरूष शिक्षकापैकी उघडेचे सहकारी शिक्षक गुरूवारी रजेवर होते.
त्यामुळे दीपक उघडे हा एकटाच शाळेत होता. दरम्यान दुपारच्या वेळी सात वर्षाच्या चिमुकलीला उघडेने वर्गाबाहेर बोलवले, तिला इशाऱ्याने स्वच्छतागृहाकडे बोलवून या चिमुकली सोबत त्याने अश्लील कृत्य केले. दरम्यान सायंकाळी ही चिमुकली शाळेतून घरी गेली. जन्मापूर्वीच पितृछत्र हरवलेली ही चिमुकली घरी गेल्यानंतर नाराज होती, नेमके काय आणि कसे झाले हेच चिमुकलीला कळत नव्हते. मात्र चिमुकलीच्या आईने मुलगी नाराज असल्याचे पाहून तिला हावभाव इशाऱ्याने विचारण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर झालेला प्रकार चिमुकलीने आईला इशाऱ्यांद्वारे सांगितला. या प्रकारामुळे चिमुकलीच्या आईला धक्काच बसला.मुलीच्या आईने गुरूवारी रात्रीच तातडीने खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात पोहचली. यावेळी चिमकुलीला बोलता येत नसल्यामुळे तिच्यावर घडलेला प्रसंग तिला सांगता येत नव्हता. मात्र, चिमुकलीच्या आईने पोलिसांना आपबिती कथन करताच पोलिसांनी या शिक्षकाविरुद्ध बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केला.

दरम्यान, शुक्रवारी या शिक्षकाला कोर्टात आणले असता मनसेचे शहराध्यक्ष संतोष बद्रे, प्रवीण डांगे, बच्चू रेळे, संजय गव्हाळे, बबलू आठवले, बाळासाहेब जवंजाळ, पवन दळवी आदी कार्यकर्त्यांनी त्या शिक्षकाला पोलिस बंदोबस्त असतानाही एक, दोन थापड लगावल्या.
दुभाषीच्यामदतीने नोंदवला जबाब : पोलिसांनीतक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली.मात्र, पीडित चिमुकली हावभाव इशाऱ्याने घटनाक्रम सांगत होती, मात्र ते पोलिसांना समजून घेणे शक्य नव्हते.त्यामुळे पोलिसांनी प्रति भाषी (दुभाषीची) म्हणून गुरूवारी उशिरा रात्री मूकबधिर विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या एका महिला शिक्षिकेला बोलावून तिच्या मदतीने जबाब नोंदवून मध्यरात्रीच दीपक उघडेला अटक केली.

बालकांवर अत्याचार चिंतेचा विषय : लैंगिकशोषण;लैंगिक अत्याचार; त्यातल्या त्यात बाल वयोगटावर होणारी ही लैंगिक अत्याचाराची साखळी हा सध्याचा ‘चिंतेचा’ तसेच ‘चिंतनाचा’ विषय आहे. पालकांनी मुलांसोबत (न घाबरता,न घाबरविता) या विषयावर बोलून अशा विकृत लोंकाबद्दल सुचक शब्दात सांगायला पाहिजे,असे शहरातील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट पंकज वसाडकर यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांिगतले.

वकीलपत्र घेऊ नये
^आजझालेल्या या घृणास्पद प्रकारची निंदा करावी तेवढी कमी आहे. या नराधम शिक्षकाची जमानत कोणीही घेऊ नये . शहरातील कोणत्याही वकिलांनी त्याचे वकीलपत्र स्वीकारू नये , त्याकरिता स्त्री संवेदना मंच सतत पाठपुरावा करणार आहे. सुचित्राबर्वे, स्त्री संवेदना मंच, अमरावती.

तगडा बंदोबस्त होता
^आरोपी शिक्षकाला कोर्टात हजर करतेवेळी मारहाण होऊ शकते, ही माहिती मिळाल्यामुळे आम्ही पूर्वीच तगडा बंदोबस्त तैनात केला. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला, मात्र तगडा बंदोबस्त असल्यामुळे ते शक्य झाले नाही. कैलाशपुंडकर, ठाणेदार, गाडगेनगर.

एक दिवसाची कोठडी
^सातवर्षाच्या मूकबधिर विद्यार्थिनीशी वर्गशिक्षकानेच अश्लील कृत्य केल्याची तक्रार प्राप्त होताच बाल लैंगिक अत्याचार बलात्काराचा गुन्हा नोंदवून शिक्षकाला अटक केली.कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अनिलकुरळकर, ठाणेदार, खोलापुरी गेट.

त्याला ‘प्रसाद’ दिला
^एकानिरागस मूकबधिर विद्यार्थिनी सोबत केलेले अश्लील घाणेरडे कृत्य रक्त खवळवणारेच आहे. त्यामुळेच आम्ही त्या नराधमाला प्रसाद दिला. असे घाणेरडे अश्लील कृत्य करणाऱ्यांना यापुढेही आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवू. संतोषबद्रे, शहराध्यक्ष, मनसे.
बातम्या आणखी आहेत...