आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेफ विष्णू मनोहर करणार 52 तास पाककृतींचा विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर २१ एप्रिल रोजी सलग ५२ तास पाककृती करण्याचा विश्वविक्रम करणार आहेत. या सर्व पाककृती शाकाहारी असतील. नागपूरच्या उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या सभागृहात २१ रोजी सकाळी ८ वाजता  सुरू हाेणारा हा उपक्रम सलग ५२ तासांनी म्हणजे २३ एप्रिल राेजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण हाेईल.
 
जागतिक विक्रम करण्याच्या उद्देशाने अायाेजित या कार्यक्रमाच्या समारोपाला प्रसिद्ध हाॅटेल व्यावसायिक विठ्ठल कामत, शेफ संजीव कपूर यांची प्रमुख उपस्थिती राहणार अाहे. शुक्रवारी सकाळी ७.१५ वाजता अंजनगावसुर्जी येथील देवनाथ पीठाचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज, िवष्णू मनोहरांचे वडील दिगंबर मनोहर, आई स्नेहलता यांच्या उपस्थितीत शुभारंभ होईल.    

पेरींचा विक्रम माेडणार  
सध्या कुकिंग मॅरेथाॅनचा ४० तासांचा वर्ल्ड रेकाॅर्ड अमेरिकेतील एम. बेंजामिन जे पेरी यांच्या नावावर आहे. मनोहर हा विक्रम माेडणार अाहेत. या सर्व पाककृतींचे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. त्याच्या विक्रीतून आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहासाठी देण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...