नागपूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषद, घटना समितीचे कामकाज तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वापरलेला कोट, बॅरिस्टरशिपसाठी वापरलेला काळा अॅप्रन, कुर्ता-पायजामा, फुलपँट, शर्टसह अनेक दैनंदिन वापराच्या कपड्यांना वाळवी लागली आहे. ज्या टाइपरायटरवर बाबासाहेबांनी घटनेचा मसुदा तसेच बुद्ध आणि धम्म हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला त्यावर मोठ्या प्रमाणात गंज चढला आहे. यासह अनेक वस्तूंवर काळाचा परिणाम जाणवत असून फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांवर राज्य चालविणाऱ्या राज्यकर्त्यांसह कट्टर आंबेडकरवादी मंडळीही हा अमूल्य वारसा जपण्याबाबत गंभीर नसल्याचे वास्तव नागपूरजवळील चिचोली येथील शांतीवन प्रकल्पात दिसून येत आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदांत बाबासाहेबांनी वापरलेला कोट आणि बॅरिस्टरशिपसाठी वापरलेल्या अॅप्रनसह अनेक वस्तूंची अशी दुरवस्था झाली आहे.
पुढील स्लाइडमध्ये,
डॉ. आंबेडकरांचा ठेवा जतन करण्यात दुर्लक्ष