आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार म्हणातात- आघाडीच्या कर्जमाफीचा फायदाच झाला, पण आता गरज नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूरमधील पाहुणचाराचा आस्वाद घेताना शरद पवार. - Divya Marathi
नागपूरमधील पाहुणचाराचा आस्वाद घेताना शरद पवार.
नागपूर - ‘सन २००६ मध्ये ‘यूपीए’ सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदाच झाला. अनेक शेतकऱ्यांची पाटी कोरी हाेऊन नवे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.  शेतमालास योग्य भाव दिल्यास शेतकरी कर्जमाफी मागणार नाहीत. अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणीही नाही. शेतीमालाला  योग्य भाव मिळाला तर त्यांना पुरेसे आहे,’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.  
 
‘अनेक केंद्रीय अधिकाऱ्यांनी आपल्याशी चर्चा करताना सांगितले की, तुमच्या आणि आमच्या विचारांमध्ये फरक आहे. भाजपची मतपेढी वेगळी आहे. मतदार शेतकऱ्यांची संख्या १८ टक्केच आहे, तर दुसरीकडे ७० टक्के वर्गाला प्राधान्य देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे,’ याकडेही पवारांनी लक्ष वेधले.

कश्मिरी घटकांशी चर्चा व्हावी  
कश्मीरची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. या संवेदनशील विषयावर कुठलेही राजकारण न करता सरकारने काश्मिरी घटकांशी चर्चा सुरू केली पाहिजे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी काश्मीरचा प्रश्न हाताळताना तेथील महत्त्वाच्या घटकांशी चर्चा सुरू केली होती. त्यामुळे तेथील वातावरण शांत झाले होते. गेल्या वर्षी मोदींनी दिवाळीच्या काळातील केलेला काश्मीर दौरा तेथे शांतता निर्माण करण्यात फायदेशीर ठरला होता. मात्र, सध्याचे वातावरण चिंताजनक आहे. अलीकडे पार पडलेल्या तेथील निवडणुकांमध्ये केवळ सात टक्केच मतदान झाले. तेथील सामान्य माणूस लोकशाहीपासून दूर जात आहे. त्यामुळे सरकारने चर्चा सुरू केली पाहिजे,  असे पवार म्हणाले.  
 
‘ईव्हीएम’साठी प्रतिनिधी  
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ‘ईव्हीएम’ला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रतिनिधी पाठवला जाणार अाहे. आमच्या आयटी तज्ज्ञाने काँग्रेसचे बटण दाबले की भाजपला मतदान कसे जाते, याचे प्रात्यक्षिक आमच्याकडे सादर केले आहे, ते अायाेगासमाेरही दाखवू, असे शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रपतिपदासाठी विराेधी पक्षांकडून दुसरा उमेदवार
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत पवार म्हणाले, ‘मी कुठेही राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत नाही. विरोधी पक्षनेत्यांच्या शुक्रवारी दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत सर्वपक्षीय सामंजस्यातून राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरावा, असा सूर उमटला. त्यासाठी सत्ताधारी पक्षाने विराेधकांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास विरोधी पक्ष वेगळा उमेदवार देेऊ शकतात,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
 
पुढील स्लाइडमध्ये, फडणवीस सरकार चांगले ना वाईट !
 
हेही वाचा.. 
बातम्या आणखी आहेत...