आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरी बुद्धीने इतके उथळ असतील असे वाटले नव्हते : शरद पोंक्षे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ओम पुरी, सलमान खान आणि आता राधिका आपटे यांना पाकिस्तानी कलावंतांचा पुळका आला आहे. ओमपुरी बुद्धीने इतके उथळ असतील असे वाटले नव्हते. उपरती झाल्यावर त्यांनी माफी मागितली. पण ओमपुरी वा राधिका आपटे असो यांना बोलतांना लाज वाटायला हवी, अशा शब्दात ख्यातनाम अभिनेते शरद पोंक्षे यांनी बोलघेवड्यांना खडसावले. लोकमान्य टिळकांवरील व्याख्यानासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

दोन देशात आर्थिक, सांस्कृतिक तसेच सर्व प्रकारे देवाणघेवाण सुरू असताना कलाकारांना संधी मिळणे एकवेळ समजू शकतो. पण सीमेवर नेहमीच युद्धसदश्य स्थिती आणि दहशतवादी हल्ले सुरू असताना कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणे हा देशद्रोहच आहे. कलाकारांनी इतकेही खालच्या पातळीवर येऊन स्वार्थी होऊ नये, असे पोंक्षे म्हणाले. राधिका आपटेने आतापर्यत दृष्ट लागवा असा अभिनय केला आहे का, असा सवाल करतानाच ती प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करणारी आहे, अशी टीका पोंक्षेंनी केली.

हिंदुअहिंसक का झाला? : हिंदूसमाजही पूर्वी लढवय्या होता. त्याला शौर्याची परंपरा आहे. असे असताना हा समाज अहिंसक का झाला? असा सवाल पाेंक्षे यांनी केला.

मग सगळे सुतासारखे सरळ हाेतील
एकेकाळी या देशात हिंदूंचा प्रचंड प्रभाव होता. हा प्रभाव ओसरल्याने अशी वक्तव्ये केली जात आहे. सलमान तसेच पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटांकडे जनतेने पाठ फिरवली पाहिजे. यांच्या चित्रपटांचे एकही तिकीट विकले जाणार नाही तेव्हाच हे रडकुंडीला येऊन सुतासारखे सरळ हाेतील. त्यानंतर असे वक्तव्य करण्याची एकाचीही हिंमत होणार नाही, असे पोंक्षे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...