आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shatrughan Sinha Commented On Bihar Election In Nagapur

लालूंवरील टीका भाेवली; शाॅटगनचा माेदींवर निशाणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबत असमाधानी असलेले भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या आक्रमक प्रचारामुळेच तेथे भाजपने ५३ जागा जिंकल्याचा चिमटाही त्यांनी काढला. ते म्हणाले, लालूप्रसाद यादव आणि जंगलराजवर टीका करणे हे बिहारी जनतेला आवडले नाही. त्याचा विपरीत परिणाम झाला.
सिन्हा आपली तक्रार घेऊन नागपुरातील संघाच्या मुख्यालयात दाखल झाले होते. मात्र, त्यांची भेट घेण्यात कुणीही स्वारस्य दाखवले नाही. सरसंघचालक मोहन भागवत आणि सचिव भय्याजी जोशी नागपुरात नव्हते. त्यांच्यापेक्षा ज्युनियर पदाधिकाऱ्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना अतिशय थंड प्रतिसाद दिला. सिन्हा यांना मंत्री नितीन गडकरी यांनीही भेट दिली नाही,असे समजते.