आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रुघ्न सिन्हां म्हणाले, सत्य बाेलणेच बंड असेल तर हाेय, आहे मी बंडखोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार विनाेद यांच्यासह शत्रुघ्न सिन्हा.
नागपूर- ‘शाॅटगन’ म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते व भाजपचे बिहारमधील खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी रविवारी नागपुरात तुफान टोलेबाजी करत गेले काही दिवस त्यांच्याविषयी पक्षात सुरू असलेल्या वादाविषयी रोखठोक भूमिका स्पष्ट करत ‘आपण भाजपतच राहाणार’ असे ठणकावून सांगितले. निमित्त होते ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद यांच्या सत्कार समारंभाचे. स्थानिक साई सभागृहात हा कार्यक्रम झाला.

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी अापल्या पक्षनेत्यांना खडे बाेल सुनावले हाेते. या निवडणुकीचे निकाल भाजपच्या विराेधात लागल्यानंतर सिन्हा यांच्या भूमिकेविषयी चांगलीच चर्चा रंगत अाहे. ‘बिहारी आणि बाहरी वाद संपवा, पक्षातील ज्येष्ठांचा आदर करा, पराभवापासून काही धडा घ्या, हे सर्व मी पक्षहित आणि
जनहितासाठी बोललो. यात काहीही चुकीचे बोललाे नाही आणि असे बोलणे बंड करणे असेल तर हरकत नाही, अाहे मी बंडखाेर,’ असे सिन्हा यांनी नागपुरात स्पष्ट केले. सामना जिंकल्यावर कर्णधाराची तारीफ होते आणि गमावल्यावर त्याच्यावरही टीकाही होते. पराभवाचे िवश्लेषण केले जाते. तुम्हाला टाळ्यांचा आनंद होतो तर टीकाही सहन करावी लागेल, असे सांगतानाच ‘ताली कप्तान को तो, गाली भी कप्तान को मिलेगी,’ असा डायलाॅगही म्हणत ‘शाॅटगन’ने अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र माेदींवर निशाणा साधला.

भाजपतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण
‘राजकारणात काेणतीही अस्पृश्यता मानू नये’

माझ्या आईचे निधन झाले, त्या वेळी सांत्वनासाठी सर्वात पहिले लालुप्रसाद यादव आले. नितीशकुमारांनी मला ‘प्राइड आॅफ बिहार’ म्हणून गौरवले. या गोष्टी मी िवसरू शकत नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी इफ्तार पार्टीत सन्मानाने बोलावूनही इतर नेते गेले नाहीत. मी गेलो तर गहजब झाला. राजकारणात अस्पृश्यता कामाची नाही, ती जपूही नये. कोणत्या वळणावर केव्हा, कोणाचे काम पडेल हे सांगता येत नाही. सर्वांना सोबत घेऊन चालले पाहिजे...अशा शब्दांत शाॅटगनने मोदींचे नाव न घेता टोमणे मारले.

यहां दर्द की दवा मिलती है
सरसंघचालक अाज नागपुरात नाहीत, नितीन गडकरी ब्राझीलला परिषदेसाठी जाणार आहेत, हे मला माहिती होते. वर्तमानपत्रांनी मात्र ‘संघाने मला भेट नाकारली, सिन्हा नरमले’ अशा बातम्या चालवल्या. त्यात मुळीच तथ्य नव्हते. मुळात मी संघाकडे भेटीसाठी वेळ मागितली नव्हती, त्यामुळे नाकारण्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही. सरसंघचालक शहरात असते तर आदरपूर्वक भेटलोच असतो. कारण ‘ये वो जगह है, जहां दर्द की दवा मिलती है...’, अशा शब्दांत सिन्हा यांनी माध्यमातील बातम्यांचे खंडन केले.

कारवाईसाठी भाजपचे केवळ दोन खासदार निवडून आले तेव्हापासून मी पक्षात आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या मार्गदर्शनात पक्षात काम केले आहे. मी मैत्री निभावणारा माणूस आहे. सत्य सांगणे बंड करणे असेल तर हाेय, मी बंडखाेर आहे, असे ठणकावून सांगतानाच आपण भाजपतच राहणार असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले.
{माझ्यावर कारवाई होणार, असे मीडियात छापून येते. अनेक पत्रकारांनीही मला असे सांगितले. यापूर्वी भाजपचे अनेक पराभव झाले तेव्हा कोणावरही कारवाई झाली नाही. वाचाळवीरांनी बेताल वक्तव्ये केली, त्यांच्यावरही कारवाई झाली नाही. मग कारवाई करायला काय मी एकटा गरीब आणि प्रामाणिकच सापडलो काय? असा सवाल सिन्हा यांनी केला.