आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिलेचे सौदर्य पाहून तुम्ही व्हाल घायाळ; दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास, जिंकला हा किताब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूरमधील शिल्पा अग्रवाल या महिलेने ‘मिसेस यूनिवर्स लव्हली पेजेंट 2017’आपल्या नावावर केला आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरात आयोजित करण्यात आली होती. 24 ऑगस्ट ते 3 डिसेंबर या काळात पार पडलेल्या या स्पर्धेत फक्त विवाहित महिलाच भाग घेऊ शकत होत्या. या स्पर्धेत 21 ते 45 वर्षाच्या 184 महिलांनी भाग घेतला होता. यात अनेक मॉडेल, टीव्ही स्टार, अभिनेत्री, उद्योगजगतातील महिलांनी भाग घेतला होता. यातील अनेक जणींनी मिस वर्ल्ड सारख्या स्पर्धाही जिंकल्या होत्या. 

शानदार अनुभव
स्पर्धेदरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला आणि मुलांच्या अधिकारासाठी आयोजित कार्यक्रमातही शिल्पाने भाग घेतला. त्यांनी तिथे आपले अनुभवही मांडले. त्या म्हणाल्या प्रत्येक स्पर्धकाकडून काहीना काही शिकण्यासारखे होते. शिल्पाने यापूर्वी म्यानमारची राजधानी रंगून येथे मिसेस इंडिया वर्ल्डवाइड ही स्पर्धा जिंकली होती.  
 
लावणीने जिंकली रसिकांची मने
शिल्पा ही नागपूरची असल्याने तिने आपल्या मराठी संस्कृतीचे दर्शन येथील नागरिकांना घडवले. तिने लावणी सादर करुन उपस्थितीतांची मने जिंकली. तिने मराठी खाद्यसंस्कृतीची ओळख करून देत मसाला-भात देखील बनवला. निधी गांधी आणि इंद्रायणी हॅन्डलूमने बनवलेला गाऊन तिने घातला.
 
शिल्पाने परिधान केला भारतीय पेहराव
मिसेस युनिव्हर्स 2017 डर्बनमध्ये पार पडला. त्यावेळी शिल्पाने नागपूरमधील इंद्रायणी हॅन्डलूम या सरकारी संस्थेने बनवलेला पेहराव परिधान केला. नागपूरमधील हॅन्डलूम कला आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने नेली.
 
कोण आहेत शिल्पा अग्रवाल
शिल्पा अग्रवाल या नागपूरात एक फर्निचर मॉल चालवतात. एमडी आणि सीईओ असल्याने त्यांना उत्पादन, विक्री, एचआर,  विपणन अशा सर्व बाबींची माहिती आहे. त्या मिसेस ग्लोबल 2015 स्पर्धेच्या उपविजेत्या होत्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्तेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्या मिस इंडिया स्पर्धेच्या प्रशिक्षक आहेत. आपले पती आकाश अग्रवाल यांच्या पाठबळामुळेच आपण यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...