आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या रायमुलकर यांची आमदारकी संकटात, जात प्रमाणपत्र ठरवले अवैध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचे जात प्रमाणपत्र विभागीय पडताळणी समितीने मंगळवारी अवैध ठरविले. त्यामुळे रायमुलकर यांची आमदारकी कोणत्याही क्षणी रद्द होऊ शकते.

मेहकर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. रायमुलकर हे सुतार जातीचे असून ही जात इतर मागासप्रवर्गात मोडते. परंतु रायमुलकर यांनी बनावट दस्तऐवजाचा आधार घेत सुतारऐवजी बलई अशी जात निवडणूक आयोगाला भासविण्याचा प्रयत्न केला. त्याच आधारावर त्यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली. याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. साहेबराव सरदार यांनी पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. परंतु समितीने त्यावर निर्णय दिला नाही. त्यामुळे सरदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, मंगळवारी अकोला येथील समितीने हे प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला.
न्यायालयात जाणार : रायमुलकर
दरम्यान, प्रमाणपत्र अवैध ठरले तरी माझी आमदारकी कायम आहे. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीत माझी चुकीची माहिती दिली. याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे, असे रायमुलकर म्हणाले.
पुढे वाचा, उपविभागीय अधिकारी काय म्‍हणाले...