आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्‍याचा शिवा खापरकर अकरा कैचीने करणार केश कर्तनाचा विश्वविक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरात केश कर्तनाचा व्यवसाय करताना या कलेला वेगळे रुप देण्याचे काम शिवा खापरकर याने केले आहे. उदरनिर्वाहासाठी करत असलेल्या कामाला, कौशल्याला विकसित करुन त्यामाध्यमातून आता तो अकोल्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणार आहे. शिवा एका हातात अकरा कैची घेऊन केश कर्तनाचा विक्रम करणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल तुषारच्या सभागृहात नागरिकांनी या आगळ्या वेगळ्या विश्वविक्रमाच्या नोंदीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. संतोष हुशे यांनी केले.

२०१२ मध्ये शिवा खापरकर यांने वीस तासात तब्बल ४०७ केश कर्तन करुन लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये शहराचे नाव नोंदवले अाहे. या वेळी महापौर उज्वला देशमुख, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील उपस्थित राहणार आहेत.
दहा कैचीचा विक्रम
तीन वर्षापूर्वी एका रिअॅलिटी शो दरम्यान जपान येथील एका व्यक्तीने एका हातात दहा कैची घेऊन केश कर्तन केले होते. तेव्हापासून त्याचा रेकॉर्ड तोडून, नवा विक्रम करण्यासाठी अकरा कैची एका हातात घेऊन सराव सुरू आहे, असे मत शिवा खापरकर यांनी व्यक्त केले.