आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारीवर उपाय, शिवसेनेचे ‘शिवान्न’; औरंगाबादसह 6 शहरांत किचन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘शिव वडापाव’ योजनेच्या धर्तीवर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासोबतच शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात ‘शिवान्न’ योजना घेऊन येत असल्याची माहिती शिवसेनेच्या शिवउद्योग सहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हर्षद नेगिनहाळ यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

या योजनेअंतर्गत फिरते उपाहारगृह, पोळी-भाजी, झुणका-भाकर केंद्र सुरू करण्यात येईल. बचत गट निर्मित खाद्यपदार्थ, फळ प्रक्रिया उद्योग, खाद्यपदार्थ उत्पादकांसाठी बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेअंतर्गत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अमरावती या सहा मोठ्या शहरांत एक सेंट्रल किचन तयार केले जाणार आहे. या मध्यवर्ती स्वयंपाकघरासाठी लागणारा भाजीपाला थेट स्थानिक शेतकऱ्यांकडून विकत घेण्यात येईल. त्यानंतर मध्यवर्ती स्वयंपाकघरात पोळी-भाजी, नाश्ता तसेच झुणका-भाकर तयार करण्यात येऊन सुशिक्षित बेरोजगारांना िवक्रीसाठी देण्यात येणार आहे.

शिवछत्रपती ग्रामविकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेळीपालन, मत्स्यपालन, कृषी पर्यटन, शेतमाल प्रक्रिया, सेंद्रिय भाजीपाला लागवड संकलन केंद्र आदी उपक्रम राबवले जातात. यासाठी शेतकऱ्यांचे ६० गट तयार केले आहेत. एका गटात २५० शेतकरी आहे. ही एक पुरवठा साखळी आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी मातोश्री फूड प्राॅडक्ट अँड सर्व्हिसेस ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.