आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivasena On The Road For The Drought Help To Farmers

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेची समांतर यंत्रणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार विविध योजनांतून प्रयत्न करत आहेच. दुसरीकडे, भाजपसाेबत राज्यात सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पक्षपातळीवर स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे.

‘शेतकऱ्यांच्या मदतीकरिता शिवसेनेने जिल्हाप्रमुखांच्या मदतीसाठी मराठवाडा व विदर्भात स्वतंत्र पथक नेमले अाहे. हे पथक व पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने साेडवतील,’ अशी माहिती शिवसेना नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी दिली. अकोला आणि अमरावती जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर रावते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम या पाचही जिल्ह्यांतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ‘शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन समुपदेशन करावे. त्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करावे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा. राज्य सरकारच्या सर्व योजनांचे लाभ मिळवून द्यावे.

सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेचा आढावा घेऊन या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो अथवा नाही याची खातरजमा करावी,’ अशा सूचनाही रावतेंनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

‘मातोश्री’वर द्यावा लागणार अहवाल
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता शिवसेनेचे दुष्काळी पथक सज्ज आहे. आपापल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरता शिवसैनिकांनी कोणते प्रयत्न केले याचा विस्तृत अहवाल जिल्हाप्रमुखांना ‘मातोश्री’वर पाठवायचा अाहे.