आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे ढोल वाजवा आंदोलन; एकाही शेतकऱ्याला मिळालेली नाही कर्जमाफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारा- कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने भंडारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी बँक अधिकाऱ्यांनी आकडेवारी दिली. त्या आकडेवारी मध्ये एकाही शेतकऱ्याला एक रुपयाही कर्जमुक्त करण्यात आलेले नाही.
 
शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, भंडारा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नाही. कर्जमुक्ती संदर्भातील निर्णय रोज बदलत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
 
शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत आंदोलन
शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत शिवसेना आंदोलन चालूच ठेवणार आहे, असे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पटले यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून बँकांमध्ये शिवसेना कर्जमुक्ती मिळालेले शेतकरी आणि प्रत्यक्षात मदत मिळालेल्यांची यादी गोळा करीत आहे. त्यासाठीच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी राज्य सरकारच्या विरोधात विविध घोषणा दिल्या. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी आकडेवारी दिली. त्या आकडेवारी मध्ये एकाही शेतकऱ्याला एक रुपयाही कर्जमुक्त करण्यात आलेले नाही.
 
आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, उपजिल्हाप्रमुख संजय रेहेपाडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख दिनेश पांडे, तुमसर विधानसभा प्रमुख महेश पटले, तालुका प्रमुख ललित बोन्द्रे, शहर प्रमुख सूर्यकांत इलमे, यशवंत सोनकुसरे, रोशन कळंबे, युवासेना जिल्हा प्रमुख मुकेश थोटे, तालुका कामगार सेनेचे मनोहर जांगळे, माजी सरपंच विनोद रहांगडाले, कुंजीलाल पटले, विजय निमजे, तोपलाल रहांगडाले, जयपाल सार्वे, आर भांडके, संदीप सार्वे, पराग वघरे, अनिल बाबारे, ताराचंद अकत्तरी, प्रभू हटवार, बाळा वाघमारे, संजय आखरे, नरेश लांजेवार, आकाश खरोले, संजय दमाहे, अक्षय तुमसरे, नितेश देशमुख, अजय चामलाटे, अविनाश संत्तेकर, सुधीर ठाकरे,राजेश चंदेल, प्रकाश चौधरी सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...