आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी करेल, शिवसेना आमदार तानाजी सावंतांचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - प्रा.तानाजी सावंत यांच्या परंडा तालुक्यातील डोंजा येथील प्रचारसभेतला व्हिडिओ व्हारयल झाला असून त्यात ‘मी महाराष्ट्राला भिकारी बनवीन, पण मी भिकारी बनणार नाही’, असे वादग्रस्त वक्तव्य आल्याने शिवसेना अडचणीत आली आहे. या वक्तव्यावरून विविध स्तरातून संताप व्यक्त होत आहे.   

प्रा.तानाजी सावंत विधान परिषद सदस्य तसेच शिवसेनेचे उपनेते आहेत. त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत परंडा तालुक्यातील डोंजा येथे प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता प्रा.सावंत यांच्या वक्तव्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात विरोधकांनी प्रा.सावंत यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली आहे. प्रा.सावंत यांनी परंडा तालुक्यातील सोनारी परिसरात खासगी साखर कारखाना उभारला असून त्या माध्यमातून त्यांनी सक्रिय राजकारणाला सुरुवात केली अाहे. शिवजलक्रांतीच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे प्रभावित झालेल्या उद्धव ठाकरे यांनी प्रा.सावंत यांना शिवसेनेचे उपनेतेपद बहाल केले होते. त्यानंतर प्रा.सावंत यांना विधान परिषदेसाठी यवतमाळमधून उमेदवारी देण्यात आली. विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर प्रा.सावंत यांनी जिल्ह्यातील शिवसेनेची धुरा ताब्यात घेतली आहे. 
 
महाराष्ट्राची माफी मागतो
- मी भाषणात गेली १५ वर्षे सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादी व काँगेस पक्षाने सिंचनावर कोट्यवधी रुपये खर्च केले, परंतु फक्त २ टक्के सिंचन झाले मग या लोकांनी महाराष्ट्र भिकारी बनविण्याचा विडा उचलला आहे का, असे मला म्हणायचे होते, परंतु काही राजकीय मंडळींनी भाषणाची क्लिप तोडून मोडून बनवली आहे. आपल्या माध्यमातून महाराष्ट्राची माफी मागतो. 
आमदार प्रा.तानाजी सावंत, उपनेते, शिवसेना.
 
भाषणात आघाडीचा विषयच नाही  
- सावंत यांनी निवडणुकीच्या भाषणात आघाडी सरकारच्या काळातील सिंचनाचा विषयच काढला नाही, संपूर्ण भाषण ऐकल्यावर लक्षात येईल. या विषयावर सध्या मी बोलणार नाही. योग्य वेळी बोलेन.   
राहुल मोटे, आमदार-राष्ट्रवादी. 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन बघा व्हिडीओ... तानाजी सावंतांनी नेमके काय म्हटले महाराष्ट्राबाबत?

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...