आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: महागाई, भारनियमनाविरोधात शिवसेनेचे जिल्ह्यात आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - गेल्या तीन वर्षात राज्य शासन सातत्याने वाढत असलेली महागाई नियंत्रणात आणण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान महागाई नियंत्रणात आणावी आणि भारनियमन बंद करावे या मागण्या रेटून धरण्यात आल्या. त्यात यवतमाळ शहरातील दत्त चौकातही हे आंदोलन करण्यात आले. 
 
गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर राज्यात नवे शासन आले. त्यांच्याकडून जनतेने खूप अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र गेल्या तीन वर्षात जनसामान्यांच्या या प्रश्नावर कोणी बोलताना दिसून आले नाही. त्यामुळे आज पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस यांचे भाव सातत्याने वाढत आहे. लोडशेडींग वाढल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. या सर्व प्रकारामुळे शिवसेना सत्तेत असली तरी शिवसेनेची बांधिलकी जनासामान्यांशी निगडित असल्याने वाढलेली महागाई कमी करण्यासाठी हे आंदोलन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवर घेण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यवतमाळ येथे झालेल्या या आंदोलनादरम्यान शिवसेना पदाधिकारी यांनी दत्त चौकात येत शासनाचा निषेध नोंदवला. त्यानंतर मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, शहर प्रमुख पराग पिंगळे, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, अरुण वाकळे, बिल्ला सोळंकी, लता चंदेल, रंजना राठोड, राजेश टेम्भरे, गिरीश व्यास, अतुल कुमटकर, पिंटू बांगर, पंकज देशमुख, उद्धव साबळे, अनिल यादव, निलेश बेलोकर, दीपक पेंटर, संजय उपगनलावर यांच्यासह शिवसेना यवतमाळ तालुका शहरचे पदाधिकारी सहभागी झाले. 
 
बातम्या आणखी आहेत...