आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेने लावल्या ‘महावितरण’मध्ये पणत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सद्या कोळसा कमी असल्याचे कारण पुढे करून महावितरणने एेन दिवाळीसमोर राज्यात भारनियमनाचा सपाटा लावला आहे. सुरू असलेले भारनियमन तातडीने बंद करण्याची मागणी करून शिवसैनिकांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन पणत्या लावून आगळेवेगळे आंदोलन केले. याचवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदनसुध्दा देण्यात आले. 
 
महावितरणने काही कारण नसताना मुद्दामहून जनतेवर भारनियमन लादले आहे, असा आरोप निवेदनाव्दारे शिवसेनेने केला आहे. ऐन दिवाळी समोर भारनियमन सुरू केल्यामुळे जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरी ग्रामीण भागात नागरिकांना पाच ते आठ तासापर्यंत भारनियमनाचे चटके सोसावे लागत आहे. वास्तविकता जनतेला महावितरणचे महागड्या दराने बिलं येतात, ती बिलाची रक्कम सुध्दा नागरीक भरणा करतात, तरीही भारनियमन सुरू आहे. सद्या वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून भारनियमन सुरू झाले आहे. दिवाळी आठ दिवसांवर आलेली आहे. 

त्यामुळे महावितरणने दिवाळीपूर्वी तातडीने भारनियमन बंद करावे अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनाव्दारे दिले आहे. शनिवारी (दि.७) दुपारी शिवसैनिक महावितरणच्या मुख्य कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी पणत्या लावून भारनियमनाचा निषेध केला. यावेळी माजी आमदार संजय बंड, राजेश वानखडे, प्रशांत वानखडे आशिष धर्माळे, नाना नागमोते, अमोल निस्ताने, उमेश घुरेडे, श्याम देशमुख, प्रविण अळसपुरे, सुनिल राऊत, परेश झंवर, बाळासाहेब उगले, अनिल चांगोले, शिरीष टवलारे, नीलेश जामठे, नवनीत उमेकर, सचिन आढाऊ, शिवराज चौधरी, अक्षय मानेकर, अविनाश वानखडे, प्रकाश अटाळकर, राजू भोयर, विकास शेळके, राजू तायडे, नरेश प्रजापती, मनोज बुंदीले, अनिल मोहोड, दिलीप ठाकरे, पिंटू कोहळे, गजानन डोंगरे, सुनिल मानेकर, अमोल तसरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...