आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर, आॅनलाईन अर्जासाठी शुल्क वसुलीची तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यशासनाच्या शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा करून तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप शेतकरी कर्जमुक्त झाला नाही. केवळ आकड्यांचा खेळ तारखांवर तारखा देणे आणि त्यासोबतच विविध प्रकारचे शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना तांत्रिक बाबीत अडकविले जात आहे. आता मात्र आम्हाला हे सहन होत नाही.
 
सर्वांसाठी धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिक खासदार आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्त्वात सोमवारी (दि. ११ सप्टे.) रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे या मागणीसाठी सुमारे १२०० शिवसैनिकांचा मोर्चा दुपारी दोन वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देण्यात आले. 
 
तत्पूर्वी दु. १२ च्या सुमारास इर्विन चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून शासनविरोधी घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागणीनुसार दसऱ्यापूर्वी जर पूर्ण कर्जमाफी मिळाली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही. खरीपाची कर्जमुक्ती रबी हंगाम सुरू होण्यापूर्वी मिळायलाच हवी, असा पवित्रा मोर्च्यात सहभागी शिवसैनिकांनी घेतला होता. 

मोर्चाचे नेतृत्व खा. आनंदराव अडसूळ यांनी केले. मोर्चात आ. श्रीकांत देशपांडे, जिल्हा शिवसना प्रमुख माजी आ. संजय बंड, प्रा. प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, शिवसेना महानगर प्रमुख सुनील खराटे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा लोखंडे, वर्षा भोयर, मनिषा टेंभरे, युवा सेना जिल्हा प्रमुख पराग गुडधे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, युवा सेना जिल्हाप्रमुख ललित झंझाड, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब राणे, किशोर माहोरे, श्याम देशमुख, प्रवीण अब्रुक, विकास येवले, दयाराम सोनी, गोपाळ राणे, नरेंद्र पडोळे, आशिष धर्माळे, प्रदीप गौरखेडे, नीलेश जामठे, बंडू साऊत, विनोद डहाके, राजू निंबरते, बाबा ठाकूर, सुभाष मुळे, गोपाल अरबट, कपिल देशमुख, टिल्लू तिवारी, अनिल पटेल, बंडू घोम, देवेंद्र औतकर, अमोल पाटील, रवींद्र टापरे, घनश्याम शिंगखाडे, लिलाधर बेलसरे, संजय जांगडा, अरुण लायबर, अजय सरोदे, रविंद्र गणोरकर, प्रवीण नेमाडे, भारत मुंढे, जयशंकर गुप्ता, किशोर कासार, अजय शिंगारे, विनय चतुर इतर शिवसैनिक उपस्थित होते. 
 
कर्जमाफीसाठी भरावयाचे अर्ज आॅनलाईन केल्यामुळे अशिक्षित शेतकऱ्यांसह आदिवासी भाग धारणी चिखलदरा तालुक्यात दुरसंचार सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांना प्रचंड ताण कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी सहन करावा लागत आहे. असंख्य शेतकरी पती-पत्नींचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकांना लिंक नसल्यामुळे सेतू सुविधा केंद्रांवर तारांबळ उडत आहे. कर्जमाफी अटी शर्थीच्या बंधनात मिळणार असल्याने शेतकऱ्यांना नवे कर्जही अद्याप मिळाले नाही. खरीपाच्या हंगामात राष्ट्रीयकृत बँका जिल्हा सहकारी बँकांच्या मागील वर्षी शेतकरी पीक विमा कर्जाची उचल यंदा फारच कमी आहे. दसऱ्यापूर्वी संपूर्ण कर्जमाफी झाल्यास रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळणे सोयीचे होईल. शासनाकडून होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी आत्महत्यांचेही प्रमाण वाढले आहे. दर दिवसाला भरल्या जाणाऱ्या कर्जमाफी अर्जाच्या तुलनेत कर्जमुक्ती होण्यासाठी वर्षाचा कालावधी लागणार असल्याची चिंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. आज सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे शेतकरी दसऱ्यापूर्वी कर्जमुक्त झालाच पाहिजे. शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा अंत पाहता शासनाकडून सकारात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. असे झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला आहे. 
 
खा. अडसूळ यांनी दिलेल्या निवेदनानुसार २८ जुनला आॅनलाईन कर्जमाफी प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर आॅनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. सर्व्हरची स्पीड कमी होती. हा प्रकार आम्ही शासनाच्या लक्षात आणून दिला. त्यांनी नवे डिव्हाईस दिले. त्यानंतर रात्रंदिवस काम करून आॅनलाईन अर्जांची संख्या वाढवण्यात आली. मी हे निवेदन शासनाला सादर करून तोडगा काढण्याची विनंती करणार आहेे. सोबतच ज्या ठिकाणी आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी पैसे मागितल्यास आमच्याकडे तक्रार करा. थेट फौजदारी दाखल करण्याची हमीही जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली आहे. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शिवसैनिकांना संबोधित करताना कांदा पिकवणारा हा शेतकरी आहे. जेवणात चव आणण्यासाठी आपण कांदा खात असतो. मोर्चात सहभागी शिवसैनिकांसाठीही कांदा-भाकरीची सोय करण्यात आली आहे. मात्र जेवणाआधी मुख्यमंत्र्यांच्या नावाने कांदा फोडून सर्वांनी नंतर त्याचा आस्वाद घ्यावा. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून कसे अश्रू वाहतात ते मुख्यमंत्र्यांना कळायला हवे. कांदा महागला तरी अन् कापला तरी सर्वांच्या डोळ्यातून धारा निघतात. त्यामुळे शिवसैनिकांनो तुम्ही कांदा फोडा अश्रू मुख्यमंत्र्यांचे निघाले पाहिजे असे वक्तव्य खा. अडसूळ यांनी केले. 
 
बातम्या आणखी आहेत...