आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेने पेरून दिले शेतक-याचे शेत, त्‍याने मागितली होती ‘इच्छा मरणा’ची परवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशिम- शासनाच्या धोरणामुळे हताश झालेल्‍या वाशिम जिल्‍ह्यातील एका शेतक-याने शासनाकडे इच्‍छा मरणाची मागणी केली होती. विठ्ठल गोविंदराव एकनार असे या शेतक-याचे नाव असून ते कारंजा तालुक्यातील आखतवाडा येथे राहतात. मात्र, शिवसेना या शेतक-याच्‍या मदतीला धावली आहे. शिवसेने चक्‍क या शेतक-याचे 12 एकर शेत पेरून दिले आहे.
काय आहे प्रकरण..
- कारंजा तालुक्यातील झोडगा धरणासाठी शासनाने जमिनी अधिग्रहित केल्‍या.
- येथील पंधरा शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत.
- त्यामुळे जमिनी संबंधीचे सर्व व्यवहार बंद पडले.
- शासन अधिग्रहीत जमिनीचा मोबदला देत नाही.
- जमीन अधिग्रहित केल्यामुळे बँक या जमिनीवर पीक कर्ज देत नाही.
- त्यामुळे पंधरा शेतकर्‍यांची कोंडी झाली. त्‍यातच विठ्ठल एकनार आहेत.
- या शेतकर्‍याने शासनाकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली होती.
- या संदर्भात उपजिल्हा प्रमुख दिनेश राठोड यांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
शेतक-यांच्‍या मदतीच्‍या सर्व प्रक्रियेला विलंब होईल म्हणून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसावर खर्च न करता गरीब शेतकर्‍यांचे 12 एकर शेत शिवसेनेने पुढाकार घेऊन पेरून दिले आहे. शिवसेना वाशिम जिल्हा प्रमुख राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पेरणी करण्यात आली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, शिवसेनेने अशी केली पेरणी..
छाया - फिरोज शेकुवाले
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...