आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिलांना हजारांचा 5 धनादेश, ११ महिलांना शिवण यंत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना शिवसेनेच्या तपोवन शाखेने मदत केली. महिलांना हजारांचा धनादेश, ११ महिलांना शिवण यंत्राचे वितरण करीत शिवसेनेने दातृत्वाचा परिचय दिला. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते विद्यापीठ चौकात शनिवारी एप्रिलला झालेल्या कार्यक्रमात ही मदत वितरीत केली. पिंपळखुटा येथील सविता गाढवे, दर्यापूर तालुक्याच्या मार्कंडा येथील संगिता वाघमारे, परसोडा येथील मंदा टेकाम, इंदला येथील असिफा खातेमा, मासोद येथील वंदना ठमके, राजूरा येथील कविता कांबळे आधी महिलांना शिवसेनेने हजारांचा धनादेश या कार्यक्रमात प्रदान केला. तर वंदना बंुदेले, राणी कांबळे, आरती मोरे, अंजली खोब्रागडे, सारीका सरोदे, अर्चना कदम, प्रिती मनोहरे, अलका बोदडे, प्रिया गोगटे, अाशा भुसारी, वनमाला खडे आदी ११ महिलांना शिवण यंत्राचे वितरण केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बंड, नगरसेविका स्वाती निस्ताने, अमोल निस्ताने उपस्थित होते. विद्यापीठ चौक शिवसेना शाखेतर्फे यावर्षी शिवजयंतीला मिरवणूक काढता, ढोल, ताशे, पोस्टर बाजी, फटाके, आतिषबाजी, घोडे, दिंड्या पथक काढता उपशहर प्रमुख अमोल निस्ताने यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा भगिनींना मदत करण्याचा निर्णय घेतला होता.
समाजप्रबोधन कार्यक्रम शैक्षणिक खर्च करणार
याच कार्यक्रमात ऑकेस्ट्रातून समाज प्रबोधनाचा कार्यक्रम देखील करण्यात आला. रंगत संगत ऑकेस्ट्रा मधील मुलीने ‘बाबा जहर खाऊ नका’ हे गीत सादर केले, या वेळी गीत एेकूण संपूर्ण परिसर गहिवरून गेला होता. हुंडाबळी, ग्रामस्वच्छता आदी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम देखील या वेळी सादर करण्यात आले.

परसोडाच्या मंदा टेकाम यांच्या पतीच्या मृत्यूनंतर संसाराची जबाबदारी त्यांच्यावर आली. मंदा टेकाम यांना दोन मुले आहेत, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार असल्याचे अमोल निस्ताने यांनी घोषित केले. राजूरातील कविता कांबळे यांनी मजूरी करीत लोकवर्गणीतून झोपडी उभारली. त्यांचे घर उभे राहावे म्हणून मोहन क्षीरसागर यांनी मदत केली.