आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्रात आहे जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती, ट्रकभर फुलांचा रिमोटव्‍दारे चढवला जातो हार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदुरा (बुलढाणा) - आज श्री हनुमान जयंतीनिमित्‍त देशभरातील मारुतीच्‍या मंदिरात भाविक भक्‍तीभावात तल्‍लीन आहेत. बुलढाणा जिल्‍ह्यातील नांदुरा येथेही आज हनुमान जयंतीनिमित्‍त भाविकांची विशेष वर्दळ पाहायला मिळत आहे. हनुमानाची जगातील सर्वात उंच मूर्ती (105 फूट) नांदुरा शहरात आहे. येथील श्री तिरूपती बालाजी संस्‍थानच्‍या वतीने यंदाही विविध धार्मिक कार्यक्रम येथे घेण्‍यात येत आहेत. रिमोट कंट्रोलने अर्पण केला जातो हार..
- या विशाल हनुमानाच्‍या मूर्तीला पुष्‍पहार अर्पण करण्‍यासाठी रिमोट कंट्रोलचा वापर केला जातो.
- मुर्तीचा अभिषेक करण्‍यासाठीही अत्‍याधुनिक रिमोट कंट्रोलचा वापर केला जातो.
- फुलांचे व्‍यापारी पुरूषोत्‍तम वायचोल दरवर्षी मूर्तीसाठी विशेष फुलहार तयार करतात.
- राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ही मूर्ती आहे.
- पुष्‍पहार अर्पण करतेवेळी भाविकांची येथे गर्दी असते.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्‍ये नोंद....
- या मूर्तीची स्‍थापना 8 नोव्हेंबर 2001 साली करण्‍यात आली.
- इष्ट गोदावरी येथील ज्ञान बाबू यांच्याकडून ही मूर्ती बनविल्या आली.
- मूर्ती तयार करण्‍यासाठी सुमारे 70 लाख रुपये खर्च करण्‍यात आले होते.
- ही मूर्ती जगातील सर्वात उंच असल्‍याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आहे.
- दररोज ३ ते ४ हजार लोक नांदूऱ्यात हजेरी लावतात.
- एक मिनीट्रक फुलांपासून या हनुमानासाठी हार तयार केला जातो.
- 40 लोक 38 तास मेहनत करून हार तयार करतात.
- रामायणातील भव्‍य मारुतीचे दर्शन ही मूर्ती घडवते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, जगातील सर्वात मोठ्या श्री हनुमान मूर्तीचे फोटो....
अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा, व्‍हिडिओ...