आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र सरकार भिकारी, अच्छे दिन येणार तरी कुठून : अॅड. श्रीहरी अणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- महाराष्ट्र सरकार भिकारी सरकार आहे, सरकारच्या खिशाला छिद्र पडली आहेत. अच्छे दिन येणार तरी कुठून, अशी टीका राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी रविवारी १७ सप्टेंबरला नागपुरात बोलताना केली. अॅड. अणे म्हणाले, राज्य सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी साठ टक्के सरकारी नोकर आणि कर्ज फेडण्यासाठी खर्च होतात. तर उरलेले चाळीस टक्के पैसे जीएसटी च्या माध्यमातून केंद्र सरकार घेऊन गेले. आता राज्य सरकारवर दिल्लीकडे कटोरे घेऊन भीक मागण्याची वेळ आली आहे. त्यापायी नितीशकुमार सारखा नेता मोदींना जाऊन मिळतो, असे अॅड. अणे म्हणाले. 

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रक्ताने सह्या करून पाठिंबा देण्यासाठी रक्ताक्षरी मोहिम आयोजित करण्यात आली. विदर्भातून दहा हजार लोकांनी आपल्या रक्ताने सही करून विदर्भाच्या मागणीला पाठिंबा देत असल्याचे पत्र विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांना रविवारी सोपवण्यात आले. ते पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोपवण्यात येणार आहे. यावेळी अॅड.अणे यांनी सरकारवर तोफ डागली. केंद्र सरकारवर टीका करताना देशात अनेक वाईट गोष्टी घडत उल्लेख त्यांनी केला. 
 
अनेक गोष्टी कायद्याच्या बाहेरच्या होत आहेत. राज्याचा गोहत्या प्रतिबंधक कायद्याची राज्याचा अॅडव्होकेट जनरल या नात्याने मी थेट उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती. त्यात गाईचा बचाव करण्यासाठी रस्त्यावर मुस्लिम समाजाला मारा हा डिफेन्स कधीही नव्हता, असे अॅड.अणे म्हणाले. वैधरित्या एखादा व्यक्ती जर मांस विकायचे काम करित असेल तरी त्याला पकडून ठोकून काढा, यासाठी मी महाधिवक्ता म्हणून बाजू मांडली नव्हती. पण आज हे राजरोस आपल्या डोळ्यादेखत सुरु आहे, असे अॅड. श्रीहरी अणे म्हणाले. तुम्ही व्यक्त केलेले मत जर सरकारच्या समर्थनात नसेल तुमच्या मृत्यूपासून तर हेटाळणीपर्यंत तुमची विल्हेवाट लावली जाऊ शकते, अशी परिस्थिती असल्याची टीकाही विदर्भवादी अणे यांनी केली. 
बातम्या आणखी आहेत...