आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीहरी अणे यांची उद्या अमरावतीत जाहीर सभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विदर्भवादी अॅड. श्रीहरी अणे यांची जाहीर सभा ३० एप्रिल रोजी शहरात आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या दिवशी असली शेर विदर्भ संघटनेच्या वतीने आॅटो रॅलीचे आयोजन केले आहे, अशी माहिती संयोजक नितीन मोहोड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी श्रीकांत तराळ, गणेश खारकर उपस्थित होते.

या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या ऑटोवर संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डाॅ. पंजाबराव देशमुख यांच्यासह विदर्भातील सामाजिक क्षेत्रातील नामवंत महापुरुषांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त विदर्भात असलेले पर्यटन स्थळे, खनिज संपदा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती दर्शवणाऱ्या फलकांचा समावेश राहणार आहे. स्थानिक जयस्तंभ चौक येथून साडे चार वाजता या रॅलीचा प्रारंभ होणार असून, जयस्तंभ चौक, श्याम चौक, राजकमल चौक मार्गे अणे यांच्या जाहीर सभास्थळी रॅली पोहोचणार आहे, असे नितीन मोहोड यांनी सांगितले.