आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांनी टाकल्या माना, धरणाने गाठला तळ, कर्जावितरणही यंदा झाले जेमतेम!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पावसाअभावी जिल्ह्यातील बहुतांश सोयाबीन, मुग, उडीदाचे पिक हाताबाहेर गेले असून सुरवातीला पेरण्या झालेले सोयाबीन सध्या रोगांच्या विळख्यात सापडले आहे. जिल्ह्यातील धरणाची पातळीही िनम्म्याहून कमी झाली असून खरीप रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याची आशा दिवसेंदिवस धुसर होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक मोडण्यास सुरवात केली असून आगामी आठवडाभर पाऊस आल्यास संत्रा, सोयाबीन, कपाशी, तुर, मूग, उडीद या प्रमुख पिकांची स्थिती भयावह होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

खरीप हंगामाच्या सुरवातीपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. तुरळक पाऊस वगळता जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने पेरणी झालेल्या पिकांची अवस्था बिकट झाली आहे. जिल्ह्यात सरासरी नव्वद टक्क्या पेरण्या झाल्या असल्या तरी आठ दिवसांत पाऊस आल्यास निम्म्याहून अधिक पिके बाद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात जून महिन्यापासूनच सर्वत्र पाऊन झाला नाही. त्यामुळे ज्या भागात तुरळक पाऊस झाला त्या भागात पेरण्या आटोपल्या. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असून वेळेवर पेरण्या झालेले सोयाबीन सध्या फुलोर, शेंगाच्या अवस्थेत अाहे. परंतु पाऊस नसल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ झाल्याने या सोयाबीनला प्रचंड फटका बसण्याची शक्यता आहे. उशीरा पेरण्या झालेले सोयाबीनच्या आशा मावळल्याने दर्यापूर, चांदूर बाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन मोडण्यास सुरवात केली आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पिके जगवण्यासाठी सिंचन सुरू केले असले तरी योग्य वातावरण नसल्यामुळे भुसार पिकांसाठी सिंचनही कुचकामी ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. दरम्यान खारपाण पट्ट्यातील भातकुली, अमरावती, दर्यापूर तालुक्यात मुग, उडीदाचे पीक हाताबाहेर गेले असल्याने उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑगस्टमध्ये साधारणत: फुला-फळावर असणारे पिक यावर्षी जेमतेम टिचभर असल्याचे भीषण चित्र असून उन्हामुळे त्याही पिकाने माना टाकल्या. 

जलसाठाअन् कर्जवितरणही नगण्य
अल्पपावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये अल्पजलसाठा शिल्लक राहिला असून खरीप रब्बी हंगामात सिंचनाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कर्जमाफीनंतर अद्यापही कर्जवाटपाला गती आल्याने जिल्ह्यात केवल सरासरी २४ टक्के कर्जवाटप होऊ शकले आहे. यात जिल्हा बँकेने केवळ ३३.९८, राष्ट्रीयकृत बंॅक १६.४६ तर ग्रामीण बंॅकेने केवळ १८.८७ टक्के कर्जवाटप केले आहे. मागील वर्षी भरमसाठ उत्पादन होऊनही अनियंत्रित बाजारपेठेत साधा हमीभावही मिळू शकल्याने शेतकऱ्यांचे मुद्दलही निघू शकले नाही. अशा अवस्थेत कर्जमाफीनंतर अद्यापही कर्ज मिळू शकल्याने शेतकऱ्यांनी उसनवारीवर पिके उभे केले. परंतु तेही आता हातातून जाण्याच्या अवस्थेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील कृषी बाजारपेठ ठप्प झाली अाहे. 

निम्म्या शेताततूर ,उडीद तर निम्मी कपाशी पेरली. परंतु सुरवाती पासूनच कमी पावसामुळे पिकांची वाढ होऊ शकली. त्यातच आता पिके सुकू लागली आहे. डोक्यावर आधीच अडीच लाख कर्जाचा बोझा आहे. काय करावे अजिबात सुचतच नाही. 
- राजू मानकर, येवदा 

सुरवातीलापावसानेथोडीफार आशा दाखविली, उशिरा का होईना पेरणी करून मुंग तूर पेरली परंतु निघण्या आधीच डुकरांनी खाल्ली. कशीबशी थोडी त्यातून वाचली ती आता सुकत आहे. त्यामुळे शेत मोडण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. - मधुकर पाथरकर, येवदा 

खरीपातील पिके हाताबाहेर गेली आहेत. उधार, हातउसन्यावर शेती उभी केली होती. आता सर्वच आशा मावळल्या आहेत.
- विनायकमाहोरे, कोकर्डा 

पेरण्याउशीराझाल्याने पिकांवर रोगांचे प्रमाण वाढले आहे. मुग, सोयाबीन, उडीदाचे पिक हातातून गेले आहे. त्यामुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
- सुनील काकड, कोकर्डा 

मागील वर्षी जास्त पावसा मुळे उळीद शेतातच सडला. त्यात मोठे नुकसान झाले. यंदा सुद्धा मुंग पावसा अभावी सुकत आहे. आता त्याला मोडण्या व्यतिरिक्त पर्याय उरला नाही. त्यातच समाधानकारक पाऊसच झाल्याने रब्बीतील हरभऱ्याची आशाही कमी झाली आहे.
- प्रल्हाद चोरे , येवदा 

जिल्ह्यातील पिकांची नजर अंदाज माहिती घेण्यात आली आहे. उशीरा पेरण्या झालेले पिक अडचणीत आले. पिकांची स्थिती बिकट आहे. 
- अनिल खर्चान, जिल्हा कृषी अधीक्षक, अमरावती. 

पिके वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न 
दुष्काळी स्थितीत सध्या फुलोर, शेंगाच्या अवस्थेतील सोयाबीनवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. अशा स्थितीतही शेतकरी आशेने महागड्या किटकनाशकाची फवारणी करून पिके वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

रब्बी हंगामही धोक्यात 
पावसाळा समाधानकार झाल्यामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही धोक्यात आला. याचा सर्वाधिक फटका अमरावती, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, भातकुली तालुक्यातील खारपाणपटट््यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना बसणार आहे. रब्बी हंगाम धोक्यात आल्यास हरभऱ्याच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता आहे. सध्या खरीपातील पिके मोडून रब्बीतील हरभऱ्याच्या पिकासाठी शेत तयार केले जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...