आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौन श्रद्धांजलीतही लाखोंच्या गर्दीने जोपासली शिस्त अन् माणूसकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोझरी - राष्ट्रसंतांना मौन श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी जमलेल्या लाखो गुरुदेव भक्तांच्या गर्दीतही रुग्णांप्रती संवेदना व्यक्त करणारी कमालीची शिस्त अन् माणूसकीचे सुंदर दर्शन घडले. मौन श्रद्धांजलीसाठी गुरूकुंज आश्रमात गुरूवारी (दि. २०) सायंकाळी लाखो गुरूदेव भक्त एकत्र आले होते. वाजून ५८ मिनीटांनी लाखोंचा जनसमुदाय स्तब्ध झाला होता. महामार्गावरील वाहनांची चाके थांबली होती. त्यानंतर साधारणत: ही गर्दी ओसरण्यासाठी सुमारे तास दीड तासांचा कालवधी लागत असतानाच मौन संपल्यानंतर महामार्गावर दोन रुग्णवाहिकांचे ‘सारयन’ वाजले अन् काही क्षणातच महामार्गावरील लाखोंच्या अफाट जनसागरातून या दोन रुग्णवाहिकांना वाट मोकळी करून देण्यात आली.अनेकदा शहरातून किंवा फारशी वाहनांची गर्दी नसलेल्या मार्गावरून रुग्णवाहिका जाण्यासाठी सरळ मार्ग मिळत नाही, मात्र गुरूवारी सायंकाळी लाखो भक्तांनी रुग्णवाहिकांना वाट मोकळी करून माणूसकीचे दर्शन घडवले.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची गुरूवारी पुण्यतिथी होती. मौन श्रध्दांजली वाहण्यासाठी जनसमुदाय दुपारी वाजतापासूनच आश्रमात दाखल झाला होता. त्यामुळे सायंकाळी ४.३० ते ५.३० पर्यंत महामार्गावरची वाहतूक पुर्णपणे थांबते. अशा गर्दीतून पायदळ मनुष्याला वाट काढणे शक्य नसताना वाजून मिनीटांनी याच गर्दीतून गुरूदेव भक्तांनी दोन रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून शिस्तप्रियतेची अनोखी प्रचिती िदली.

पोलिसांनीही चोख बजावले कर्तव्य
गुरूदेव नगरात उसळलेला जनसागर, मार्ग बंद, त्यामुळे पोलिसांचाही या ठिकाणी चोख बंदोबस्त आहे. स्वाभाविकच या दोन रुग्णवाहिका आल्या, त्यावेळी पोलिसांनीसुद्धा आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले. पोलिसांना नागरिकांनीही साथ दिल्यामुळे रुग्णवाहिकांना सहजपणे मार्ग काढून रुग्णाला पोहचवण्यासाठी मदत झाली.

बातम्या आणखी आहेत...