आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसाहेबांनी येथेच गिरवले युद्धकलेचे धडे, फोटोतून पाहा शिवरायांच्‍या मामाचे गाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वाड्यात जिजामातेचा जन्‍म झाला. - Divya Marathi
या वाड्यात जिजामातेचा जन्‍म झाला.
बुलढाणा - जिल्‍ह्यातील सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्‍मगाव. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. याच जाधवांच्‍या वाड्यात 12 जानेवारी 1598 रोजी राजमाता जिजाऊसाहेबांचा जन्‍म झाला. हा दिवस आज सिंदखेडमध्‍ये मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. या वाड्यातील ऐतिहासिक वास्‍तू आजही मोठ्या दिमाखात उभ्‍या आहेत. राजमाता जिजाऊ जन्‍मदिनानिमित्‍त जाणून घेऊया जाधवांच्‍या वाड्यातील काही वास्‍तू व ऐतिहासिक प्रसंगांबाबत..
जाधवांच्‍या वाड्यातील ऐतिहासिक वास्‍तू
लखुजी जाधवांच्‍या सिंदखेडमधील वाड्यात, रंगमहाल, सावकारवाडा, लखुजी राजांची समाधी, गंगासागर, बाळसमुद्र नावाच्‍या विहीरी, चांदणीतलाव असे अनेक ऐतिहासिक जलसाठे व वास्‍तू आहेत. दरवर्षी जिजाऊ जन्‍मोत्‍सवाला राज्‍यातील हजारो लोक येथे भेट देतात.
आईसाहेबांनी येथेच गिरवले युद्धकला नि राजकारणाचे धडे
सिंदखेड राजामधील मोती तलावाच्या बाजूच्या असलेल्‍या पठारावर राजमाता जिजाऊ घोड्यावरून फेरफटका मारायच्या असे सांगितले जाते. याच ठिकाणी त्‍यांनी युद्धकला नि राजकारणाचे शिक्षण घेतले, असेही म्‍हणतात. त्‍यामुळे हा परिसर देशाच्‍या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे.
- राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्‍ये सिंडखेड राजा येथे झाला.
- जिजाऊंच्‍या आईचे नाव म्हाळसाबाई होते.
- लखूजीराजे जाधव यांनी मुलांबरोबरच जिजाऊंनाही राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले.
- जिजाऊंनी येथे युद्धकला नि राजनीतीमध्‍ये प्रावीण्य मिळवले.
- याचाच उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, छत्रपती शिवरायांच्‍या मामाच्‍या गावातील फोटो...