आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरखेड येथे गावठी बंदुकीसह सहा जिवंत काडतुसे व तिन चाकू जप्‍त, एकाला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरखेड(यवतमाळ)-  गावठी बंदुकीसह सहा जिवंत काडतुस व तिन चाकु जप्‍त केल्‍याची घटना सोमवार दि. 11 रोजी साडेचार वाजेच्‍यास दरम्‍यान उघडकीस आली आहे. पोलीसांना मिळालेल्‍या गोपनीय माहीतीच्‍या पोलीसांनी सापळा रचुन एका इसमला अटक केली आहे. 
 
पुसद मार्गावर एक  इसम येथिल बॅंकेमध्ये हिरव्या रंगाच्या ब्‍यागी मधून गावठी बंदुक आणि जिवंत काडतुसे घेऊन जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीसांनी त्‍या इसमाला लगेच ताब्‍यात घेवून त्‍याची चौकशी केली असता, त्यांच्या जवळ एक गावठी बंदुक, सहा जिवंत काडतुसे व तीन चाकु आढळुन आली. पोलीसांनी सरदरील हत्यार ताब्‍यात घेवून त्‍या इसमाला अटक केली. मुब्लीक कयुम खान,45 वर्ष ( वसंतनगर ता.पुसद) असे अटक करण्‍यात आलेल्‍या अरोपीचे नाव आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सह पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी सापळा रचुन ही कारवाइ केली. खुलेआम हत्यार घेऊन फिरणा-या  आरोपीचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...